छत्रपती संभाजीनगर
Trending

करमाड रेल्वे क्रॉसिग गेट दुरस्तीसाठी तातपुरत्या स्वरुपात वाहतुक मार्गात बदल !

संभाजीनगर लाईव्ह, दिनांक 07 : करमाड येथील रेल्वे क्रॉसिग गेट क्र 67 चे दुरस्तीचे काम करण्याकरीता तात्पुरती वाहतुक पर्यायी मार्गाने दि. 10 फेब्रुवारी  ते 10 मे 2023 या कालावधीत वळविण्यात येणार आहे.

पूर्वीचा वाहतुक मार्ग करंजगाव ते शेकटा-जालना-औरंगाबाद तात्पुरता वाहतूक बदल मार्ग करंजगाव गाढेजळगाव मार्गे औरंगाबाद जालना रोड-गाढेजळगाव फाटा. पूर्वीचा वाहतुक मार्ग शेकटा – करंजगाव- ढवळापुरी जाणारा मार्ग तात्पुरता वाहतूक बदल मार्ग गाढेजळगाव फाटा- गाढेजळगाव गाव-करंजगाव ढवळापूरी असा राहील.

जिल्हादंडधिकारी औरंगाबाद मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (ध) अन्वये प्राप्त अधिकारानुसार उक्त प्रयोजनार्थ जिल्हादंडधिकारी यांना प्राप्त असलेल्या अधिकारान्वये वाहतुकीसाठी रस्ता वळविणे बाबतदचा आदेश जारी केले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!