छत्रपती संभाजीनगर

ठाणेदारांची खांदेपालट!, तुमच्या पोलीस ठाण्याचा चार्ज आजपासून “यांच्याकडे’…

संभाजीनगर, दि. ११ ः शहरातील १९ पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरीक्षकांची बदली पोलीस आयुक्‍त डॉ. निखिल गुप्ता यांनी केली आहे. यातील १३ निरीक्षकांपैकी ९ जणांनी बदलीची विनंती केली होती, तर चौघांनी कार्यकाळ पूर्ण केला होता.

या पोलीस निरीक्षकांची बदली…
व्यंकट केंद्रे जिन्सी पोलीस ठाण्यातून बदलून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गेले आहेत. विठ्ठल पोटे सिडको एमआयडीसीतून पुंडलिकनगर, सुरेंद्र माळाळे साताऱ्यातून विशेष शाखेत, गणपत दराडे क्रांती चौकातून नियंत्रण कक्षात, प्रशांत पोतदार बेगमपुऱ्यातून सातारा (प्र.अ.), अशोक भंडारे सिटी चौकातून जिन्सी (प्र.अ.), विनोद सलगरकर सिडकोतून दौलताबाद (प्र.अ.), दिलीप गांगुर्डे पुंडलिकनगरातून वाळूज वाहतूक शाखा, गौतम पातारे सायबर ठाण्यातून सिडको एमआयडीसी (प्र.अ.), कैलास देशमाने सिडको वाहतूक शाखेतून छावणी (प्र.अ.), राजेश मयेकर जिन्सीतून सिडको वाहतूक शाखेत बदलून गेले आहेत.

हे सहायक पोलीस निरिक्षक बदलले…
सय्यद मोसीन अली सिटी चौक पोलीस ठाण्यातून वाळूज, मनिषा हिवराळे छावणीतून वेदांतनगर, विनायक शेळके वाळूजमधून सातारा, सुनील कराळे साताऱ्यातून सिटी चौक, ज्ञानेश्वर अवघड सिडकोतून छावणी तर राहुल जाधव यांची बदली नियंत्रण कक्षात झाली आहे.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

Back to top button
error: Content is protected !!