सिल्लोड

…म्‍हणून पत्‍नीने केली पतीविरुद्ध बलात्‍काराची तक्रार!; सिल्लोडमध्ये असं नक्की काय घडलं वाचा…

सिल्लोड, दि. ११ ः विभक्‍त राहत असूनही पतीने तिच्या माहेरी येत नशेच्या गोळ्या खाऊ घालून बलात्‍कार केल्याची घटना सिल्लोडमध्ये समोर आली आहे. पत्‍नीच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी ९ डिसेंबरला गुन्हा दाखल केला आहे.

पीडित विवाहिता सिल्लोडमध्ये वडिलांकडे राहते. तक्रारीनुसार, तिचे लग्न शेख फराजसोबत २५ मे २०१७ रोजी औरंगाबादला झाले होते. लग्नानंतर सहा महिनेच तिला चांगले वागविण्यात आले. नंतर सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्यामुळे विवाहितेने सासरच्यांविरुद्ध मनमाड पोलिसांत तक्रारही केली होती. नंतर ती सिल्लोडला माहेरी आली. ४ डिसेंबरला रात्री साडेदहाला तिचा पती सिल्लोडला आला. या वेळी विवाहिता एकटीच घरी होती. डोके दुखत असल्याचे सांगितल्यावर पतीने तिला डोकेदुखीच्या गोळ्या खायला दिल्या.

गोळ्या घेताच विवाहितेला नशा आली. त्यानंतर शेख फराजने तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी विवाहितेला जाग आल्यावर तिने पतीला याबाबत जाब विचारले, तेव्हा याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकेन, अशी धमकी दिली. त्‍यामुळे विवाहितेने पोलिसांत धाव घेऊन आपबिती सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत पोलीस निरिक्षक अशोक मुदिराज यांनी पत्रकारांना सांगितले, की पती-पत्‍नीत पटत नसल्याने ते वेगळे राहतात. पतीने तिच्यावर नशेची गोळी देऊन बलात्‍कार केल्याची तक्रार आहे. शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!