महाराष्ट्र
Trending

वकीलाने ३० हजारांची लाच मागितली, अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु ! गुन्ह्याचे तपास अधिकारी ओळखीचे असल्याचे सांगून मागितली लाच !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९- गुन्ह्याचे तपास अधिकारी ओळखीचे असल्याचे सांगून ३० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आरोपी वकीलावर जालना जिल्ह्यातील अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

राहुल सांडू भगत (व्यवसाय -वकील, रा. रवी निवास, नारळी बाग छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने लाचेची मागणी दि. 11/08/2023 रोजी केली. 50,000/- रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 30,000/- रुपये ठरले होते.

यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध भा द वि कलम 498(अ) अन्वये दाखल गुन्ह्याचे तपास अधिकारी हे माझ्या परिचयाचे आहेत व तपास अधिकारी यांनी तुमच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये तुमच्या पत्नीचा पुरवणी जबाब न नोंदवण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासमध्ये सहकार्य करण्यासाठी 30,000/- रुपये लाचेची मागणी केली आहे असे सांगून लोकसेवक हे परिचयाचे असल्याचा प्रभाव टाकून पंच साक्षीदारा समक्ष तक्रारदार यांच्याकडे 30,000/-रुपये लाचेची मागणी केली म्हणून वकील राहुल भगत यांच्या विरुद्ध अंबड पोलिस स्टेशनमध्ये (जि. जालना) गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी:- संगीता पाटील, पोलीस उपअधीक्षक, सापळा पथक – पोह / दिगंबर पाठक, अशोक नागरगोजे पोअं/ विलास चव्हाण, चालक चांगदेव बागुल यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!