महाराष्ट्र
Trending

गुणरत्न सादवर्ते यांची गाडी फोडणाऱ्या सरपंच मंगेश साबळेंनी स्पष्ट केली भूमीका ! असा केला गनिमी कावा, समाजात फुट फाडणाऱ्या पक्षांच्या चाटुकारांना दिला कडक इशारा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ – जालन्याच्या अंतरवाली सराटीतून पेटलेला मराठा आरक्षणाचा वणवा आता संपूर्ण राज्यात पसरला आहे. शांततेच्या मार्गाने सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा राज्य सरकारने चांगलाच धसका घेतला असताना राजधानी मुंबईतील गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडून पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा असून आमच्या दोघांचीही एकच मागणी आहे. हजारो लाखो वर्षांनंतर मनोज जरांगे सारखे नेतृत्व जन्माला येत असते. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर मराठ्यांच्या घराघरांत छत्रपती शिवाजी महाराजानंतर मनोज जरांगे पाटील यांचा फोटा लागणार असून सरकारने सोमवारी अधिवेशन बोलावून तातडीने मराठ्यांना आरक्षण जाहीर करावं. जर का मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याद राखा असा इशाराही सरपंच मंगेश साबळे यांनी राज्य सरकारला दिला. याचबरोबर पक्षातील काही चाटूकारांना इशारा देत गनिमी कावा काय असतो हे ही त्यांनी स्पष्ट केलं. साबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांची भूमीका त्यांच्याच शब्दात…

जय शिवराय मित्रांनो मी मंगेश साबळे बोलतोय. मित्रहो दोन दिवसांपासून काही मराठा समाजातीलच पक्षाच्या चाटूकर्त्यांचा फोन येतोय. आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं मराठा समाजात फुटी निर्माण करण्याचा ते प्रयत्न करताय. मी माझं स्पष्टीकरण स्पष्टपणे दिलेले आहे की माझ आंदोलन आणि सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच आंदोलन हे एकच आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठीच आम्ही लढत आहे. पण या ठिकाणी मला तुम्हाला स्पष्ट करायचं आहे की, जे की मी करू इच्छित नव्हतो. ते मला आता नाईलाजाने स्पष्ट करावे लागत आहे. कारण काही कंटक समाजामध्ये भेदभाव व समाजामध्ये फुटी पाडण्याचं काम करत आहे.

आम्ही काचा फोडल्या पकडला गेलो- मित्रहो एखादा मावळा जेव्हा लढाईवर जातो आणि तो पकडला जातो तर तो त्याच्या राजाचं नाव सांगत नाही. एखादा सैनिक जेव्हा लढाईला जातो तेव्हा तो पकडला जातो तो देशाचं नाव सांगत नाही. त्याचप्रमाणे आमची गत झाली. आम्ही काचा फोडल्या पकडला गेलो म्हणून सन्माननीय जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शांततेच्या उपोषणाला कुठलेही गालबोट लागू नये म्हणून आम्ही त्यांचं नाव घेणं टाळलं. एवढंच नाही तर मराठ्यांच्या देवाच्या विरोधात आम्हाला त्या दोन दिवसापुरतं बोलावं लागलं. हा एक गनिमी कावा होता आणि हे आज मला स्पष्ट करावं लागतंय नाईलाजानं. म्हणून सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांची मागणी आणि आपली मागणी एकच आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. त्याला गालबोट लागता कामा नये. हे शंभर टक्के खरं आहे तुमचं. पण मित्रहो सन्माननीय मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. आज त्यांना पाच दिवस होत आहेत. त्यांच्या नरड्यामध्ये पाण्याचा घोट नाही. तो माणूस जिद्दी आहे माघार घेणार नाही.

शासनाला अशा पद्धतीने धडा शिकवणसुद्धा गरजेचं- तरुणांना आत्महत्या करू नये म्हणून ते सांगत आहे. पण समाजासाठी बलिदान द्यायला सुद्धा तो माणूस तयार आहे. शेकडो वर्षांनंतर तयार झालेलं हे नेतृत्व आहे. पुन्हा असं नेतृत्व आपल्याला भेटणार नाही. म्हणून त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून शासनाला अशा पद्धतीने धडा शिकवणसुद्धा गरजेचे आहे. काय साध्य झालं अशा पद्धतीचा धडा शिकवून ? तुम्हाला सांगतो सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिडकारून लावलंय त्या सदावर्तेंना. त्यांचा आणि माझा काही संबंध नाही दोनच दिवसात आमची भेट झालीय, हे ते आता सांगायला लागलेत. सहा महिन्यापूर्वी वर्षांपूर्वी त्यांनीच सांगायला पाहिजे होतं पण कालच्या या प्रकरणामुळे ते सांगायला लागलेत सदावर्ते आणि माझा काही संबंध नाही.

स्टंटबाजी वगैरे काही नाही- काय फरक झालाय त्या गाड्या फोडल्यामुळे ? स्टंटबाजी वगैरे काही नाही. अशा पद्धतीने सुद्धा लढावं लागतं. अशा पद्धतीने सुद्धा स्वतंत्र मिळवावा लागतं अशा पद्धतीने सुद्धा चाप द्यावा लागतो. तेव्हा हे सरकार ठिकाणावर येतं.

समाजाविरोधात राणेंना तोंड बंद ठेवण्याचा इशारा- नारायण राणे यांना सांगतो, की कालच्या बाईटमध्ये त्यांच्याविरुद्ध मी सन्मानाने बोललो होतो की सन्माननीय नितेश राणे, नारायण राणे यांचं चांगलं कर्तत्व आहे. कारण त्यांनी मागे समाजासाठी चांगलं काम केलं होतं. पण आता जर का ते समाजाला शिवीगाळ करत असतील…… ते म्हणतात मी मातोश्रीवर आम्ही त्या ठिकाणी होतो. तूम्ही आमदार आहात. तुम्हाला कसं आमदार समाजाने केलं ? हे मलाही कळेना ? लहान पोरासारखं टाळूला लावली जीभ आणि बोलायला लागले. रात्री मातोश्री होतं. खोटं बोलायला लाज वाटते का नाही ? समाजाविषयी वक्तव्य करणं आधी तुम्ही तिघांनी बंद करावं. नाहीतर तुम्हाला सदावर्तेंसारखा चाप दिल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही. रस्त्यावर फिरकू देणार नाही लक्षात ठेवा तुम्ही समाजापेक्षा मोठे नाही. एक कोटी सात कोटीचा समाज आहे. एक कोटी समाज रस्त्यावर आला होता. त्यांची अवहेलना करायची हिंमत तुमची कशी काय होते ? तुमच्याकडून समाजाचं काम होणार नसेल तर थोबाड बंद ठेवा. तुम्हाला कोणी विचारायला आलेलं नाही.

तुम्ही सांगता अजून वेळ लागतो मग एवढे दिवस झोपा काढत होता का तुम्ही ?- मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही आमची मागणी आहे. सरकारला चेतावणी या मंगेश साबळेची आहे की, मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचं जर का काही बरं वाईट झालं तर याद राखा तुम्ही ३० दिवसांचा वेळ मागितला होता तुम्हाला ४० दिवस वेळ दिला आणि सकाळी लाईव्ह पत्रकार परिषदेत तुम्ही सांगता अजून वेळ लागतो. झोपा काढत होते का तुम्ही ? तुम्हाला किती वेळ पाहिजे ? तुम्ही 24 डिसेंबरची तारीख शिंदे कमिटीला दिली. म्हणजे 24 डिसेंबरपर्यंत वाट बघायची. पुन्हा अजून महिनाभर मराठ्यांना झुलवत ठेवायचं. मग लोकसभेची आचारसंहिता लागणार. लोकसभेच्या निवडणुका लागणार. लोकसभा होऊन जाणार या आशेत तुम्ही राहू नका. कुठली निवडणूक होणार नाही जोपर्यंत मराठ्यांना टिकणार कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही. टिकणार म्हणजेच मी काय वाईट बोललो ? कोणतं आरक्षण टिकू शकतं. तुम्हाला माहिती आहे की 50% च्या आत ओबीसी प्रवर्गात कुणबी प्रमाणपत्र हेच आरक्षण टिकू शकत.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो घराघरांमध्ये लागणार- सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या शांततेत चालू असलेल्या आंदोलनाला कुठलेही गालबोट लागता कामा नये. शांततेच्या मार्गाने गांधी मार्गाने संविधानिक पद्धतीने आंदोलन उपोषण ते करत आहे. मी सरकारवर दबाव आणण्यासाठी किंवा माझे बांधव त्या आमदार खासदारांच्या गाड्या फोडतात हेही योग्य. असं केल्याशिवाय ते वाठणीवर येणार नाही. आपले बांधव यांनी मारले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना आपल्यातून जाऊ देनं हे आपल्यासाठी खूप महागाचे आहे. हजारो लाखों वर्षांपूर्वी असं नेतृत्व उभं राहतं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो घराघरांमध्ये लागणार आहे आरक्षण भेटल्यानंतर. त्यांचा लढा मोडित काढण्याची ताकद कोणामध्ये नाही. मी तर चिल्लर माणूस. या ठिकाणी मी माफी मागतो. सन्माननीय मनोज जरांगे पाटील आमचे देव आहेत. मी दिलगीरी व्यक्त करतो की मला त्यावेळी त्यांच्याविषयी बोलावं लागलं पण मी एवढा नादान नाही मी जर का राजधानीत जाऊन काचा पडत असेल तर एवढा चिल्लर नाही की स्वार्थीपणासाठी माझ्या देवाला नाव ठेवेल. पण नाईलाजानं मजबुरीनं पोलीस प्रशासन सीबीआय हे आंदोलन कसं मोडीत काढायचं याच्यावर लक्ष ठेवून होते. म्हणून मी त्यांना विरोधात बोललो. बोलावं लागलं. नव्हे तर मी बोललो. याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये.

मराठा समाजात फूट वगैरे काही नाही- मराठ्यात फूट पडली आहे. मराठे दोन ठिकाणी झाले आहे. जहाल गट मवाळगट असा काही होणार नाही. सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे. पुन्हा चेतावणी जर का मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर रस्त्यावर तुम्ही फिरकू नका. घराच्या बाहेर तुम्ही निघू नका.

यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा- समाजाच्या विरोधात बोलू नका. हेच आहे ते पेलनार नाही झेपनार नाही. रोज आत्महत्या होताहेत. समाजाचे तरुण टाकीवरून उडी मारून आत्महत्या करत आहेत. नालायकाहो… तुम्हाला कळत कसं नाही. एक एक जीव महत्त्वाचा आहे. मनुष्यवधाचे गुन्हा तुमच्यावर दाखल करायला पाहिजे.

अधिवेशन बोलवून तातडीने आरक्षण द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे. सोमवारी अधिवेशन बोलावून तातडीने मार्ग काढून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आरक्षण मिळेल असा तातडीने निर्णय काढा. नाहीतर गावागावांत फिरण तुमचं बंद होईल. याशिवाय समाजामध्ये फुट पाडण्याचं काम काही चाटुकार करत आहे. मला माझी भूमिका स्पष्ट करायची नव्हती. एक शिवरायांचा मावळा जरांगे पाटील यांचा मावळा म्हणून तो गड आम्ही फतेह केला आहे. याचा अर्थ त्यांनी सांगितलं अस नाही. पण याही गोष्टी कराव्या लागतात. मित्रहो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जय जिजाऊ जय शिवराय.

Back to top button
error: Content is protected !!