करमाड: दरेगाव शिवारातील गणेश गड मंदिरात चोरी; एलसीडी, दान पेटीतील रक्कम, सीसीटीव्ही कॅमेरा चोरीस ! सय्यदपूर शिवारातील खंडोबा मंदिरातील दान पेटीही फोडली !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – दरेगाव शिवारातील गणेशगड मंदिरात चोरट्यांनी एलसीडी, दान पेटीतील रक्कम, सीसीटीव्ही कॅमेरा चोरी केला. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हा डाव साधला. याशिवाय सय्यदपूर शिवारातील खंडोबा मंदिरातील दान पेटीही चोरट्यांनी फोडली. करमाड पोलिस चोरट्यांचा शोध घेत असून त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
विनोद प्रतापसिंग डोभाळ (वय32वर्षे व्यवसाय शेती व गणेश गड मंदिर अध्यक्ष रा. दरेगाव ता जि औरंगाबाद) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते ग्रामपंचायत सदस्य असुन गणेश गड येथील गणेश मंदिराचा अध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहेत. दिनांक 25/4/23रोजी नेहमी प्रमाणे गावातील गणेशगड मंदिर येथील गणेश मंदिरात पूजा करणारे पुजारी गणेश बद्रीनाथ पुंगळे हे संध्याकाळी सात वाजता पूजा करून गणेश मंदिराच्या समोरील गेट लावून घरी गेले.
त्यानंतर दिनांक 26/4/2023रोजी सकाळी गणेश मंदिरात पूजा करण्यासाठी नेहमी प्रमाणे 06.30 वाजता गेले असता त्यांना मंदिराच्या समोरील गेट तुटलेले दिसले. तेव्हा गणेश पुंगळे यांनी अध्यक्ष विनोद प्रतापसिंग डोभाळ यांना फोन केला व मंदिराचे गेट तुटल्या बाबत माहिती दिली. तेव्हा विनोद प्रतापसिंग डोभाळ यांनी व त्यांचे मित्र दोघे मोटार सायकलने तातडीने गणेशगड येथे मंदिरात पोहोचले. त्यांना तेथे मंदिराचे गेट तुटलेले दिसले. तुटलेल्या गेटमधून डोकावून पाहिले असता मंदिरामध्ये लावलेली सॅमसंग कंपनीची एलसीडी, मंदिरात ठेवलेली दानपेटी व मंदिरात बसविलेला एक सीसीटीव्ही कॅमेरा चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सॅमसंग कंपनीची एलसीडी काळ्या रंगाची, 32 इंची दान पेटी मधील रक्कम, एक सीसीटीव्ही कॅमेरा आदी १४ हजारांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. तसेच मौजे सय्यदपूर शिवारातील खंडोबा मंदिरातील दान पेटी रात्री सात ते आठ वाजेच्या दरम्यान फोडल्याची माहीती समजली आहे.
मंदिराचे अध्यक्ष विनोद प्रतापसिंग डोभाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून करमाड पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe