छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूजफुलंब्री
Trending

फुलंब्रीच्या ट्रकचालकास ए एस क्लबजवळ लुटले ! जिओ ग्रीन ऑर्गेनिक खताच्या 400 गोण्यांसह ट्रक पळवला !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ -फुलंब्रीच्या ट्रकचालकाला मध्यरात्री ए एस क्लबजवळ लुटले. जिओ ग्रीन ऑर्गेनिक खताच्या 400 गोण्यांसह ट्रक पळवला. कार क्र. MH 02 CL 2276 व पल्सर क्र. MH 28 BE 6048 यावर आलेल्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश अशोक काकडे (वय २८, चालक, रा. आळंद, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 28/05/2024 रोजी रात्री 01.30 वाजेच्या सुमारास ए. एस. क्लब चोरडीया पेट्रोलपंपजवळ असलेल्या गतीरोधकवर ट्रकची गती कमी झाली. याचदरम्यान, कार क्र. MH 02 CL 2276 व पल्सर क्र. MH 28 BE 6048 यावर आलेल्या अनोळखी सहा जणांनी ट्रक अडवली. ट्रक चालक योगेश काकडे व क्लिनर लक्ष्मण खमाट या दोघांना ट्रक खाली ओढून लाथाबुक्याने व लाकडी दांड्याने मारहाण केली. माल घेवून घेऊन पळून गेले.

1) 20,000/- (वीस हजार) रुपये रोख रक्कम ज्यात 500 रुपये दराच्या 40 भारतीय चलनी नोटा. 2) 13,00,000/- (तेरा लाख रु.) किंमतीची टाटा ट्रक 3) 2,72,000/- (दोन लाख बहात्तर हजार रुपये) किंमतीचे Rallis India Limited कंपनीचे जिओ ग्रीन ऑरगेनिक खताच्या प्रत्येकी 50 कि.ग्रॅ. वजनाच्या एकूण 400 बॅग प्रत्येकी 680 रुपये किमतीची एक बॅग. असा एकूण 15,92,000 (पंधरा लाख ब्यान्नव हजार रु.) किंमतीचा माल घेवून चोरटे पसार झाले.

याप्रकरणी योगेश अशोक काकडे (वय २८, चालक, रा. आळंद, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांवर 503/2024 कलम – 395,341, 427 नुसार एम वाळूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि शिंदे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!