बीडच्या दोन डॉक्टरांवर छत्रपती संभाजीनगरात हल्ला, डोक्यावर पिस्टल रोखून जिवे मारण्याचा प्रयत्न ! झटापटीत पिस्टलच्या मुठीने मारून जखमी केले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – जेवण करत असलेल्या चार डॉक्टरांशी सुरवातीला वाद घातला. त्यानंतर दोन डॉक्टरांच्या डोक्याला पिस्टल रोखून धमकावले. पिस्टलच्या मुठीने डोक्यावर वार करून दोन डॉक्टरांना जखमी केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहारातील आकाशवाणी चौक रिलायन्स मार्टच्या समोरील हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास घडली. चार डॉक्टर मित्रांपैकी दोघे जखमी झाले. हे चारही डॉक्टर हॉटेलमध्ये जेवण करत असताना ही घटना घडली.
दीपक सुंदरराव फाटक (वय 34 वर्षे धंदा डॉक्टर, रा. आहेर धानोरा ता. जि. बीड), डॉ. एकनाथ पांडुरंग पवार (जि. रुग्नालय, बीड) अशी जखमी डॉक्टरांची नावे आहेत. दीपक सुंदरराव फाटक (वय 34 वर्षे धंदा डॉक्टर, रा. आहेर धानोरा ता. जि. बीड) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, गेवराई येथे फलके हॉस्पिटलच्या समोर त्यांचा स्वता: चा दवाखाना आहे.
दि. 25/06/2023रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास डॉ. दीपक फाटक व मित्र डॉ. एकनाथ पांडुरंग पवार (जि. रुग्नालय, बीड), डॉ. अभिजीत विजय येवले (रा. अंबिका चौक बीड), मनोज सुदामराव टाक (रा. भगवाननगर गेवराई बीड), डॉ. जीवन नानासाहेब चव्हाण (सामान्य रुग्नालय बीड) हे सर्व जेवणासाठी के. ए. लन्ज आकाशवाणी चौक रिलायन्स मार्टच्या समोर छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. जेवण चालू असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आला.
त्यांच्याशी वाद घालु लागला. त्यावर डॉ. दीपक फाटक व त्यांच्या डॉक्टर मित्रांनी त्यास समजवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्या कमरेची पिस्टल काढली. डॉ. दीपक फाटक यांच्या डाव्या भुवईच्या वरती डोक्याला पिस्टल लावून स्ट्रिगरवर बोट ठेवून धमकावून जिवंत मारण्याचा प्रयत्न करीत केला. त्यानंतर पिस्टलची मुठ मारून डॉ. दीपक फाटक यांना जखमी केले. याचवेळी डॉक्टर मित्र एकनाथ पांडुरंग पवार यांनी त्याचा हाथ पकडला. त्यावेळी अनोळखी मारेकर्याने डॉक्टर एकनाथ पांडुरंग पवार यांच्या डोक्याला डाव्या बाजुला पिस्टल लावून पिस्टलच्या मुठीने जोराने मारले व जखमी केले.
त्यानंतर त्या मारेकर्याच्या सोबतच्या दोन अनोळखी व्यक्तींनी डॉ. दीपक फाटक यांच्या डॉक्टर मित्रांना शिवीगाळ करून चापटबुक्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दीपक सुंदरराव फाटक (वय 34 वर्षे धंदा डॉक्टर, रा. आहेर धानोरा ता. जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिन्सी पोलिस स्टेशमध्ये तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe