छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

पडेगाव ते मिटमिटा रस्त्यावरील अनाधिकृत मटण शॉप व खानावळीचे अतिक्रमणाव जेसीबी फिरवला !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २५- छावणी ते पडेगाव रस्त्यावरील अनाधिकृत मटण शॉप आणि खानावळ निष्कासित करण्यात आले.

आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने आज पडेगाव ते मिटमिटा रोडवरील उघड्यावर विक्री करणारे अनाधिकृत १५ चिकन मटण दुकानांचे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले असून सबंधित दुकानाचे सामान जप्त करण्यात आले आहे.

तसेच ०३ खानावळीचे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले आहे. टेबल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार,अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, अतिक्रमण निरीक्षक रविंद्र देसाई, खडसे, नागरी मित्र पथक, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!