महाराष्ट्र
Trending

मनोज जरांगे पाटलांनी आज घेतला हा मोठा निर्णय ! मराठा आरक्षणाची लढाई आता निर्णायक वळणावर !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – मराठा आरक्षणावर गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या आमरण उपोषण आता निर्णायक वळणावर पोहोचले असून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ महिन्याची मुदत मागितली होती त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १ महिन्याची मुदत दिली असून आतापर्यंत ४० वर्षे दिली एक महिनाही देवून पाहू. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळ उपोषणस्थळी आल्यावरच उपोषण सोडू अन्यथा उपोषण सुरुच राहणार असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी आज, १२ सप्टेंबर रोजी जाहीर केला.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटलांचे ३० ऑगस्टपासून उपोषण चालू आहे. शांततेच्या मार्गाने सुरु असलेले हे उपोषण मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मंडपात घुसून १ सप्टेंबर रोजी अमानुष लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जच्या निषेधार्थ संपूर्ण मराठवाड्यात पडसाद उमटले. सराकारने आंदोलनकर्त्यांना लाडीगोडी लावण्यासाठी जालना जिल्ह्याच्या एसपींना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा केली. दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षिय नेत्यांची बैठक घेवून आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचा निर्णय घेतला. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्यांची मुदत मागून उपोषण मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल, ११ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना केलेल्या विनंतीनुसार आज दुपारच्या सुमारास मनोज जरांगे यांनी उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या मराठा समाज बांधवाशी संवाद सांगितला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ४० वर्षे दिले अजून १ महिना देवून पाहू परंतू ३१ व्या दिवशी सरसकट मराठ्यांना आरक्षणाचे पत्र देणार का, असा सवाल उपस्थित केला. माझी बांधीलकी ही मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. मराठ्यांच्या झोळीत आरक्षणा टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धारही जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनुसार १ महिन्याची मुदत देण्यास जरांगे यांनी सकारात्मकता दाखवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच मंत्रिमंडळ उपोषणस्थळी आल्यावरच उपोषण सोडणार ते जर आले नाही तर उपोषण सुरुच राहणार, अशी भूमीकाही जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. याशिवाय शासनाने दोन्ही राजेंना निमंत्रण पाठवून त्यांनाही उपोषणस्थळी घेवून यावे अशी गळही जरांगे पाटील यांनी सरकारला घातली.

Back to top button
error: Content is protected !!