वैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील माय लेकराच्या मानेवर कोयता चालवून खून, राजेंद्र उर्फ बापु दामोदर सूर्यवंशीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२- वैजापूर तालुक्यातील जिरी शिवारातील शेतीच्या बांधावरून माय लेकराचा कोयत्याने खून केल्याच्या प्रकरणात एकाला न्यायालयाने दोषी ठरवून दुहेरी जन्मठेपेची शिक्षा दिली. वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी ही शिक्षा सुनावली. राजेंद्र उर्फ बापु दामोदर सूर्यवंशीला (वय 38 वर्षे रा. वळण ह.मु जिरी शिवार, ता वैजापूर, जि.औरंगाबाद) असे न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रुपाली संजय सूर्यवंशी (वय 32 वर्षे) व तिचा मुलगा गोकुळ संजय सुर्यवंशी (वय 15 वर्षे) यांच्या खून प्रकरणात हा महत्त्वपूर्ण निकाल वैजापूर न्यायालयाने दिला. फिर्यादी सुनील अशोकराव काकडे (वय 27 वर्षे, व्यवसाय शेती, राहणार खोपेनवर बोलठाण ता.गंगापूर जि. औरंगाबाद) यांनी पोलीस स्टेशनला दिनांक 06.06.2017 रोजी तक्रार दिली की, शिऊर कार्यक्षेत्रातील जिरी शिवारातील शेत गट नं.108 मध्ये बहीण मृत रुपाली संजय सूर्यवंशी (वय 32 वर्षे) व सदर गुन्हयातील आरोपी राजेंद्र दामोदर सूर्यवंशी याची शेती आहे. या शेतामध्ये समाईक बांध आहे.

बांधावरून आरोपी राजेंद्र दामोदर सुर्यवंशी व मृत रुपाली संजय सुर्यवंशी यांच्यात वाद सुरू होता. दिनांक 06.06.2017 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जिरी शिवारातील शेत गट नं 108 मधील रुपाली संजय सुर्यवंशी व आरोपी राजेंद्र दामोदर सूर्यवंशी यांच्या समाईक बांधावरील रोवलेले सिंमेटचे पोल आरोपी काढत होता. रुपाली संजय सुर्यवंशीने आरोपीस पोल काढू नका असे सांगितले.

दोघांत वाद झाला व आरोपी राजेंद्र दामोधर सुर्यवंशी याने घरातील कोयता आणून रुपाली संजय सुर्यवंशी हिच्या मानेवर वार करून ठार मारले. रुपालीचा मुलगा गोकुळ संजय सुर्यवंशी (वय 15 वर्षे) हा भांडण सोडविण्यास गेला असता आरोपी राजेंद्र दामोदर सुर्यवंशी याने कोयत्याने गोकुळ यासही मानेवर वार करून ठार मारले. ही घटना मृत रुपाली संजय सुर्यवंशीची मुलगी तनुजा संजय सूर्यवंशी (वय 08 वर्षे) व पुत्नी गायत्री निवृती सुर्यवंशी (वय 11 वर्षे) यांनी प्रत्यक्ष पाहिली होती.

ही घटना घडल्या नंतर मृत रुपालीचा भाऊ संजय अशोकराव काकडे (वय 27 वर्षे) यांनी शिऊर पोलीस स्टेशनला दिनांक 06.06.2017 रोजी फिर्याद दिली. सदर फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी वैजापूर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात सरकारी वकील नानासाहेब शिवाजीराव जगताप यांनी

सरकार पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदार तपासलेले. सदर साक्षीदारापैकी गायत्री निवृती सुर्यवंशी, तनुजा संजय सुर्यवंशी, डॉ एस जी गिते व तपासी अंमलदार धनंजय रामराव फराटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपी तर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी राजेंद्र उर्फ बापु दामोदर सूर्यवंशी यांनीच गोकुळ संजय सुर्यवंशी (वय 15 वर्षे) व रुपाली संजय सुर्यवंशी यांचा खून केलेला असल्याचे न्यायालयासमोर सिध्द झाले.

साक्षीपुराव्याच्या अधारे जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एम.आहेर यांनी आरोपीस राजेंद्र उर्फ बापु दामोदर सूर्यवंशी यास रुपाली संजय सुर्यवंशीचा खून केला म्हणून कलम 302 भादवी अन्वये नुसार जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्षे कैद तसेच गोकुळ संजय सुर्यवंशी (वय 15 वर्षे) याचा खून केला म्हणुन कलम 302 भादवी अन्वये नुसार जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्षे कैद भारतीय दंड संहीता नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली व दोन्ही शिक्षा एकत्र भोगणे असे आदेशीत केले आहे. वैजापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील एका आरोपीस दुहेरी जन्मठेपीची ही दुसरी शिक्षा असल्याची माहिती सरकारी वकील नानासाहेब शिवाजीराव जगताप यांनी दिली.

हा निकाल वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी दिनांक २२/०२/२०२३ रोजी दिला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील  नानासाहेब शिवाजीराव जगताप यांनी काम पाहिले. पो.स्टे. शिऊर पोलीस निरीक्षक धनंजय फराटे व पैरवी अधिकारी विठल बदने यांनी सहकार्य केले.

Back to top button
error: Content is protected !!