महाराष्ट्र
Trending

विक्रम कडक चहा पत्तीच्या डुप्लिकेट मालाची बदनापूर, कळमनुरी, रिसोड व बुलडाण्यात विक्री ! तालुका जालना पोलिसांत उमरखेडच्या आरोपीवर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – नामांकित विक्रम कडक चहाची हुबेहुब नक्कल करून बदनापूर (जिल्हा जालना), कळमनुरी (जिल्हा हिंगोली), रिसोड (जिल्हा वाशीम), देऊळघाट (जिल्हा बुलढाणा) आदी ठिकाणी हा बनावट माल पाठवून विक्री केल्या प्रकरणी जालना तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहीत खान (उमरखेड जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे.

किशोर सर्जेराव खैरे (वय 37 वर्षे, लिगल एक्जीक्युटीव विक्रम टि प्रोसेसर प्रा. लि. जालना) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. कंपनी ही भारतीय कायदया अर्तगत पंजीकृत करण्यात आलेली आहे. कंपनी गट क्रमांक 11 व 12 माळाच्या गणपती जवळ सिंदखेड राजा रोड, बोरखेडी ता. जि. जालना या ठिकाणी आहे.

कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या चहा पत्तीचे उत्पादन व विक्री करत आहे. ज्यामध्ये विक्रम कडक डस्ट चाय, लयन नं.5, तितली, विक्रम गोल्ड ईत्यादी चहा पाकीटांचा समावेश आहे. उत्तम प्रतीचे उत्पादन व योग्य प्रकारचे मार्केटींग या आधारावर आमचे कंपनीचे मालास सामान्य ग्राहकांमध्ये मागणी आहे. कंपनीने उत्पादित होणाऱ्या मालासाठी वैशिष्टय पूर्ण कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीना कायदेशीर संरक्षण मिळविण्यासाठी कॉपीरइट कार्यालयाकडे नोंदणी केली आहे.

त्यानुसार विक्रम कडक डस्ट चहा या चहा पाकीटाचे कलाकृतीला कपीराईट मिळविण्यासाठी कंपनीने अर्ज केला आहे. त्याचे TM सर्टिफिकेट कंपनीकडे आहे. विशिष्ट रंगसंगती आकर्षक रचना त्यावरील कप बशीचे चित्र या सर्व बार्बीमुळे ग्राहक विक्रम कडक डस्ट चहाला ओळखतात. या लोकप्रियतेचा गैरफायदा घेण्यासाठी काही नक्कल करणार्या उत्पादकांनी विक्रम कडक डस्ट चहाची नक्कल करण्यास सुरुवात केल्याचे कंपनीच्या नुकतेच निदर्शनास आले.

विक्रम कडक इस्ट चहा पॉकेटासारखे हुबेहुब रंगसंगती असणारी पॉकेट ज्याचे रंगामध्ये फिक्कट रंग वापरलेला आहे. आमचे कंपनीचे ओरिजनल पॉकेटची पॅकींग कटींग आणि बनावट कंपनिचे पॉकेटची कटींगमध्ये सिल कटिंग मशीनची साईज मोठी आहे. बनावट पॉकेटावर एमआरपी व एक्सपायरी डेट तसेच बॅच क्रमांक हे आकाशी रंगात साध्या शाईने प्रिंट केलेले आहे. जे की कंपनीच्या ओरिजनल पॉकेटवर ओरिजनल प्रिंटींग आहे.

अशा प्रकारे बनावटीकरण करून विक्री केल्यामुळे सामान्य ग्राहकांची व कंपनीची फसवुणक झालेली आहे. नक्कल करणाऱ्या उत्पादक रोहीत खान (उमरखेड जि. यवतमाळ) यांनी कंपनीच्या विक्रम कडक डस्ट चहा या कलाकृतीची हुबेहुब नक्कल करून कंपनीच्या कलाकृतीची नक्कल करणारा उत्तादक त्यांचा माल बदनापूर (जिल्हा जालना), कळमनुरी (जिल्हा हिंगोली), रिसोड (जिल्हा वाशीम), देऊळघाट (जिल्हा बुलढाणा) या ठिकाणी शहरामध्ये विकत आहेत. अशी कंपनीस खात्रीशीर माहीती मिळाली.

कंपनीने कंपनीचे डिस्ट्रीब्युटर यांना वरील नक्कल करणारे उत्पादक यांना ऑर्डर दिली असता त्यांनी एका गोणीमध्ये बनावट पॉकेट दिलेली आहेत. त्यामुळे त्याच सोबत इतर ठिकाणी नक्कल करणाऱ्या उत्पादकाने अन्य ठिकाणी बनावट उत्पादक चहा पत्ती पाठवलेली आहे. दरम्यान, कंपनीचे टी टेस्टर या पदावरील अधिकारी अमेया कुमार बेहरा हे आहेत. त्यांनी टी मनेजमेन्ट कोर्स, एल. एम. जैन कंपनी कोलकत्ता येथे कोर्स केलेला आहे. त्यांनी सदर बनावटीकरण केलेल्या चहाची गुणवत्ता तपासणी केली असता सदर चहा कमी गुणवत्ता असलेला चहा असल्याचा अहवाल दिलेला आहे.

याप्रकरणी कंपनीचे लिगल अधिकारी किशोर सर्जेराव खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका जालना पोलिस स्टेशनमध्ये रोहीत खान (उमरखेड जि. यवतमाळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!