छत्रपती संभाजीनगर
Trending

लेबर कॉलनीत तलवार घेवून दहशत निर्माण करीत फिरणारा युवक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 28 इंच लांबीची तलवार जप्त !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – तलवार घेवून दहशत निर्माण करीत फिरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. लेबर कॉलनी, विश्वासनगर येथील पाडलेल्या शासकीय निवासस्थान परिसरातून पोलिसांनी त्या तलवारीसह पकडले. अक्षय ऊर्फ काळ्या राजु हिवाळे (वय 23 वर्षे, रा. विश्वास नगर, मनपा शाळेच्या बाजुला, फाजलपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे.

दिनांक 16/06/2023 रोजी रात्री 08.30 वाजेच्या सुमारास गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर येथे माहिती मिळाली की, लेबर कॉलनी, आण्णाभाऊ साठे चौक छत्रपती संभाजीनगर येथे एक जण हातात तलवार घेवून फिरत आहे. त्यामुळे आजुबाजुच्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यावरून गुन्हे शाखेचे पथक लेबर कॉलनी भागात पोहोचले असता एक जण पोलिसांना पाहून पळून जावू लागला.

त्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून त्यास लेबर कॉलनी, विश्वासनगर येथील पाडलेल्या शासकीय निवासस्थान परिसरातून शिताफीने पकडले. त्याच्याकडून 28 इंच लांबीची तलवार ताब्यात घेतली. त्यास त्याचे नाव गांव व पत्ता विचारले असता अक्षय ऊर्फ काळ्या राजु हिवाळे (वय 23 वर्षे, रा. विश्वास नगर, मनपा शाळेच्या बाजुला, फाजलपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्यास तलवार घेवून फिरण्याचे कारणे विचारले असता काहीएक समाधान कारक उत्तर त्याने दिले नाही. त्याच्याविरुध्द पोलीस ठाणे सिटीचौक, छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते व सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप गुरमे, पोलीस उप निरीक्षक प्रविण वाघ, व पोलीस अंमलदार योगेश नवसारे,विजय भानुसे, विजय घुगे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, कैलास काकड, अश्वलिंग होनराव यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!