छत्रपती संभाजीनगर

कचनेर येथील चोरी झालेल्या भगवान पार्श्वनाथ मूर्तीचे सोन्याचे तुकडे पोलिसांनी सन्मानाने ट्रस्टला सोपवले !

संभाजीनगर लाईव्ह, दि 11 – कचनेर येथील चोरी झालेल्या भगवान पार्श्वनाथ मूर्तीच्या सोन्याचे तुकडे पोलिसांनी मंदिराच्या ट्रस्टला आज सन्मानाने परत केले. मुर्तीच्या सोन्याचे तुकडे ज्यांची किंमत 94,87,797,/- रुपयांचे कचनेर संस्थानास के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, यांचे हस्ते सोपवण्यात आले. संस्थानच्या पदाधिकारी यांनी पोलीसांचे आभार मानले.

दिनांक 25/12/2022 रोजी विनोद रुपचंद लोहाडे रा. औरंगाबाद यांनी पोलीस ठाणे चिकलठाणा येथे फिर्याद दिली की, दिनांक 8/12/22 ते 23/12/2022 यादरम्यान श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगांबर जैन मंदिराचे गाभा-यातील पार्श्वनाथ भगवंताची 1,05,00,000/- (एक कोटी पाच लाख रूपये) किंमतीची 02 किलो 56 ग्रॅम वजनाची सुवर्ण धातूची मुर्ती अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. कलम 380 भादंवी प्रमाणे पोलीस ठाणे चिकलठाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयांचे अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद व पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली या संवेदनशील गुन्हयांचा अत्यंत सचोटीने तपास करून गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेने काही तासांच्या कालावधीत दिनांक 26/12/2022 रोजी गुन्हा उघडकीस आणला.

यातील मुख्य आरोपी 1) अर्पित नरेंद्र जैन रा. शिवपुरी जि.गुणा राज्य मध्यप्रदेश 2) अनिल भवानीदिन विश्वकर्मा रा. शहागड जि.सागर राज्य मध्यप्रदेश यांना अटक केली. आरोपीतांनी पार्श्वनाथ भगवंताची मुर्ती तोडुन त्यांच्या सोन्याचा भाग वितळुन सोन्याचे तुकडे तयार केले होते. काही तुकडयांचा भाग विकुन त्यातील पैशातुन कर्ज फेडले तर दोन 102 ग्रॅम वजानांची सोन्याचे शिक्के खरेदी केली होती.

आरोपीकडुन 1604.98 ग्रॅम मुर्तीचे सोन्याचे तुकडे किं.अं. 87,56,195 रुपये व 102 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे शिक्के किं.अं. 6,29,302/- रूपये असे 1706.98 ग्रॅम सोने धातु किं.अं. 93,85,497/- यासोबत 70,000/- रोख दोन मोबाईल किं.अ. 32,300/- असा एकुण 94,87,797/- (चौ-यान्व लाख सत्ताऐंशी हजार सातशे सत्यान्नव रूपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

हा गुन्हा मनिष कलवानिया पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, औरंगाबाद ग्रामीण, श्री. रामेश्वर रेंगे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. श्री देविदास गात, पोलीस निरीक्षक, चिकलठाणा, पो.उप.नि. प्रदिप ठुबे, विजय जाधव, पोलीस अंमलदार लहु थोटे, श्रीमंत भालेराव, शेख नदीम, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली होती.

गुन्हयातील जप्त करण्यात आलेला 1706.98 ग्रॅम सोने धातुचे तुकडे किं.अं. 93,85,497/- हे संपुर्ण कायदेशिर प्रक्रिया अत्यंत जलद गतीने पुर्ण करून श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगांबर जैन मंदिराचे (ट्रस्ट) पदाधिकारी यांना आज दिनांक 11/02/23 रोजी मा. के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, यांचे हस्ते परत करण्यात आले आहे.

यावेळी श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिंगबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर ट्रस्ट चे सर्व श्री संजयकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष, सुरेशकुमार कासलीवाल, ललीतकुमार पाटणी, भरतकुमार ठोळे, माणिकचंद बडजाते, फुलचंद जैन, विनोदकुमार लोहाडे, हेमंत बाकलीवाल, मेहेंद ठोळे, ऍ़ड प्रमोद पाटणी, सचिन पाटणी, निलेश काला, किरण मास्ट असे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, मा. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस निरीक्षक देवीदास गात, रविंद्र खांडेकर, पोलीस निरीक्षक, चिकलठाणा, पो.उप.नि. प्रदिप ठुबे, विजय जाधव, पोलीस अंमलदार लहु थोटे, श्रीमंत भालेराव, शेख नदीम, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, जिवन घोलप उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!