शहागंज, सिटी चौक, मिल कॉर्नर, निराला बाजार, कुंभारवाडा, औरंगपुरा, गुलमंडी रस्त्यावरील अतिक्रमणांवर हतोडा ! महानगरपालिकेने उगारला २५ जणांवर कारवाईचा बडगा !!
वाहतुकीचे रस्त्यावरील अतिक्रमणे काढली, डाव्या बाजूने वळण घेणाऱ्या वाहनाना रस्ता मोकळा
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ डिसेंबर – शहरातील बाजारपेठेतील वाहतुकीला अडथळा करणारे व रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारका विरुद्ध आज कारवाई करण्यात आली.
महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभाग यांच्या वतीने आज शहरातील जवळपास २५ अतिक्रमणधारका विरुद्ध कारवाई करण्यात आली. सदर कारवाई शहागंज, सिटी चौक, मिल कॉर्नर, मुख्य बस स्टँड रोड, निराला बाजार, कुंभारवाडा, औरंगपुरा ते गुलमंडी रस्त्यावर करण्यात आली.
सदर ठिकाणी काही व्यापारी आणि काही नागरिकांनी डाव्या बाजू डाव्या बाजूने वाहन वळण घेत असताना फुटपाथवर केलेले अतिक्रमण काढण्यात आली. यामध्ये फुटपाथवर कच्चे पक्के बांधकाम करून वाहतुकीला आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास होईल असे अतिक्रमण निष्काशित करण्यात आले.
काही ठिकाणी दुकानांचे बोर्ड जप्त करण्यात आले. कुंभारवाडा येथे व नाथ मार्केट परिसरात तर व्यापाऱ्यांनी दहा फुटापर्यंत लोखंडी टेबल ठेवून रस्ता अडविला होता यांचे अतिक्रमण काढण्यात आले व रस्ता मोकळा करण्यात आला. कुंभार वाडा येथे पाच बाय पाच व पाच बाय दहा या आकाराचे ओटे काढण्यात आले.
वाहतुकीला अडथळा करणारे चार चाकी वाहन सुद्धा हटवण्यात आले. ही कारवाई प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद यांनी केली. अतिक्रमण पथक कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe