वैजापूरच्या युवकाचे पोलिस होण्याचे स्वप्न अर्धवट ! रनिंग करून रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या युवकाला दुचाकीस्वाराची धडक !!
शिऊर बंगला ते नालेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अपघातात नालेगावचा युवक जखमी
- कठोर मेहनत घेणा-या प्रेमराजवर दुचाकीस्वार काळ बनून आला आणि त्याच्या स्वप्नाचा चक्काचूर केला.
संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – गेल्या दोन वर्षांपासून कठोर मेहनत घेणाऱ्या युवकाचे पोलिस होण्याचे स्पप्न एका अपघातामुळे अर्धवट राहिले. रनिंग करून रस्त्याच्या बाजूला पंख्यावर काहीशी विश्रांती घेत असलेल्या युवकावर एका दुचाकीस्वाराने धडक दिली आणि त्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर केला. या अपघातात हा युवक जखमी झाला असून डॉक्टरांनी त्याला जड वस्तू आणि रनिंग करण्यास मनाई केली आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात सध्या पोलिस भरती सुरु असून यासाठी त्याने पूर्ण तयारी केली होती. पण…
प्रेमराज रावसाहेब त्रिभुवन (वय24वर्षे व्यवसाय शिक्षण, शेती रा. नालेगाव ता. वैजापूर) असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रेमराज त्रिभुवन याचा शेतीवर उदरनिर्वाह चालतो. त्याला तीन बहिनी असून त्यांचे लग्न झालेले आहे. वडील रावसाहेब यांचे २० वर्षांपूर्वी निधन झालेले आहे.
प्रेमराज त्रिभुवन याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दि. 03/12/2022 रोजी सायंकाळी 07.45वाजेच्या सुमारास तो नागाव ते शिवूर रोडने पोलीस भरतीची तयारी करीत असताना रनिंग करून भागीरथी विद्यालयाच्या जवळ रोडच्या पूर्व बाजुच्या पंख्यावर बसलेला होता.
याचेवेळी गावातील अदित्य बाळु भागडे याने भरधाव मोटारसायकलने (MH20FM9667) प्रेमराज त्रिभुवन यास जोरदार धडक दिली. शिऊर बंगल्याकडून नालेगावकडे जात असताना त्यांने ही धडक दिली. या अपघातात प्रेमराज त्रिभुवनच्या पोटाला व छातीला दुखापत झाली. त्यानंतर तेथे गावातील मित्र व चुलता यांनी प्रेमराज त्रिभुवन यास मोटारसायकलने उपचार कामी शिऊर येथील सिद्दीविनायक हॉस्पिटल येथे दाखल केले.
तेथे प्रेमराज त्रिभुवनवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचार कामी संजीवनी हॉस्पिटल वैजापूर येथे दाखल केले. त्यावेळी तेथे प्रेमराज त्रिभुवन याची आई विठाबाई आल्या त्यांनी अधिक उपचार कामी गजानन हॉस्पिटल औरंगाबाद येथे हलवले. तेथे मी उपचार घेतल्यानंतर दि. 14/12/2022 रोजी डॉक्टरांनी प्रेमराज त्रिभुवन यास सुट्टी दिली. प्रेमराज त्रिभुवन हा सध्या घरीच असून त्यास चालता फिरता व उठून बसता येत नाही. डॉक्टरांनी दिलेल्या औषध व गोळ्या तो जाग्यावरच घेत आहे.
याप्रकरणी प्रेमराज रावसाहेब त्रिभुवन याने दिलेल्या तक्रारीवरून आदित्य बाळू भागडे याच्यावर शिऊर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
दोन वर्षांच्या मेहनतीवर पाणी…
प्रेमराज त्रिभुवन याचे पोलिस होण्याचे स्वप्न. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी तो गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत आहे. कठोर मेहनत घेणार्या प्रेमराजवर हा दुचाकीस्वार काळ बनून आला आणि त्याच्या स्वप्नाचा चक्काचूर केला. त्याच्या छातीला मार लागला असून SPLEEN हा अवयव डॉक्टरांनी काढून टाकला आहे. यामुळे त्याला सध्या दम लागतो. चालणे आणि जड वस्तू उचलण्यास डॉक्टरांनी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. चालताना आणि पळताना त्याला दम लागतो.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe