छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

औरंगाबादेत कर थकवणाऱ्या मालमत्तांना सील ठोकले ! मनपाच्या धडक कारवाईने थकबाकीदारांचे धाबे दणाणले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २८- प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार महानगरपालिके तर्फे शहरातील निवासी व व्यवसायिक मालमत्ता धारक यांच्याकडील थकीत मालमता कर व पाणी पट्टी बाबत सर्व ०९ झोन अंतर्गत सातत्याने कर वसुली व मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू आहे. आज उप आयुक्त तथा कर निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांच्या मार्गदशनाखाली सर्व झोन क्र ०१ ते ०९ अंतर्गत विविध भागात थकीत मालमत्ता कराची वसुली व जप्तीची कारवाई करण्यात आली. एकूण ०४ व्यवसायिक मालमत्ता सील करण्यात आल्या.

यात प्रामुख्याने सहाय्यक आयुक्त (झोन क्र 9)  असद खान यांच्या मार्गदर्शना खाली वार्ड क्र .104  रेल्वे स्टेशन येथील साई ट्रेड सेंटर येथील एकूण 05- मालमत्ता जप्ती करणे कामी पथक गेले असता त्यापैकी 1 मालमत्ता धारकांनी ऑनलाईन रक्कम 1,02518/- मनपा फंडात जमा केली व उर्वरित 4 मालमत्ता धारकांचे नाव/ मालमत्ता संगनिकीय क्र. खालील प्रमाणे आहे.

1) अब्दुल मजीद अब्दुल मोमीन डी 0045073 शॉप क्र 12 एकूण थकबाकी रु.88,607/- 2) राजाराम ए. गणागे  डी 0045072 एकूण थकबाकी 60992- 3) देवानंद नारायण कोटगिरे D0045068 एकूण थकबाकी 153835/- 4) देवानंद नारायण कोटगिरे D0045091 एकूण थकबाकी 2,09947/- असे एकूण मागणी 5,13381/- रुपये करीता मालमत्ता सील करण्यात आले.

ही कारवाई पथक प्रमुख  सईद मिर्झा ,वसुली कर्मचारी संतोष मगरे, राजू आमराव, विनोद साळवे ,अशोक जाधव, काझी, झोंबर्डे ,तांत्रिक कर्मचारी क. अ. गायकवाड सूरज, शापुरवाड यांनी केली. एकूण ०४ व्यवसायिक मालमत्ता सील करण्यात आल्याची माहिती कर निर्धारक व संकलक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!