बदनापूरच्या पोलिस उपनिरीक्षकाकडून १० हजार लाचेची मागणी ! जामीन होण्यास मदत करण्यासाठी मागितली लाच !!
जालना, दि. १० – पोलीस ठाणे बदनापूर येथे विविध कलमाखाली दाखल गुन्ह्यात जामीन होण्यास मदत करण्यासाठी बदनापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकांनी पंचा समक्ष १० हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
भागवत पांडुरंग वाघ (पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे बदनापूर, जिल्हा जालना) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या भावावर पोलीस ठाणे बदनापूर येथे विविध कलमाखाली गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्हयात तक्रारदाराच्या भावाला जामीन होण्यास मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भागवत पांडुरंग वाघ यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचमागणी पडताळणी दिनांक 7.2.2023 रोजी केली. १० हजारांची मागणी त्यांनी केली.
ही कारवाई संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, सुदाम पाचोरकर,पोलिस उप अधिक्षक, ला.प्र.वि जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी: एस एस शेख, पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि. जालना, सापळा पथक :-पोलीस अंमलदार गणेश चेके, कृष्णा देठे, जावेद शेख, शिवाजी जमदाडे, ज्ञानदेव जुंबड, ज्ञानेश्वर मस्के यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe