छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

हडको, हर्सूल टी पॉइंट परिसरातील अतिक्रमणावर जेसीबी फिरवला ! उद्धवराव पाटील चौक, हिमायत बाग, रोजाबाग व वानखेडेनगर परिसरात उद्या कारवाई !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने हर्सूल टी पॉइंट परिसरातील एन 12 आणि 13 भागात कारवाई करण्यात आली. प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. सदर मोहिमेत आज एकूण 12 टपरी धारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.

दहा बाय दहा आणि पाच बाय दहा दोन अंडा आमलेटच्या साध्या हात गाड्या, एका लोडिंग रिक्षामध्ये तयार केलेली टपरी विरुद्ध कारवाई करण्यात आली असून या लोकांनी सदर टपरी जमिनीत बांधकाम करून गाडल्या होत्या. जेसीबीच्या साह्याने सदर टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

हर्सूल परिसरातील महावितरण कार्यालयाच्या लगत एन 12 यादवनगर लगत आणि टी पॉइंट पेट्रोल पंपाच्या समोरील भागात हे अतिक्रमण होते. या सर्व अतिक्रमधारकांना वेळोवेळी सूचना देण्यात आली होती. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली होती तरी देखील यांनी प्रशासनाला न जुमानता पुन्हा टपऱ्या लावल्या होत्या. या सर्वांविरुद्ध आज कारवाई करण्यात आली.

यापैकी दोन लोकांनी हरित पट्ट्यामध्ये हिरवी जाळी लावून साधे टेबल ठेवून किरकोळ गाडी लावून अतिक्रमण केले होते ते पण काढून टाकण्यात आले. उद्या उद्धवराव पाटील चौक ते हिमायत बाग, हिमायत बाग ते रोजाबाग व एन १३ वानखेडे नगर या परिसरात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांनी दिली.

या कारवाई वेळेस पोलीस फौजफाटा सुद्धा असणार आहे. सर्व अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन महापालिका प्रशासन तर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, ही कारवाई पद निर्देशीत अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद ,रामेश्वर सुरासे यांच्या पथकाने केली.

Back to top button
error: Content is protected !!