छत्रपती संभाजीनगर
Trending

पोलिसाची कॉलर पकडून लाथ मारली, हॉटेलच्या कुकची दादागिरी ! टी व्ही सेंटर परिसरात गस्तीवरील पोलिसांसोबत दोघांची झटापट !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – नियमानुसार रात्री आस्थापना बंद करण्याचे आदेश असतानाही रेस्टॉरंट सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना ते बंद करण्याची सूचना दिल्यानंतर दोघांनी पोलिसांसोबत झटापट केली. शिविगाळ करून पोलिसांची कॉलर पकडून लाथ मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधील टी व्ही सेंटर परिसरात रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना रात्रीच ताब्यात घेतले. पोलिस अंमलदार विशाल आण्णा पवार यांच्याशी दोघांनी झटापट केल्याचे प्राथमिक तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

विशाल आण्णा पवार (वय 30 वर्षे, पोलीस अंमलदार, पोलीस ठाणे सिडको छत्रपती संभाजीनगर) हे मागील दीड वर्षापासून नेमणुकीस असून सध्या टु मोबाईल वर चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सिडको पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दि. 09/05/2023 रोजी चे 21.00 ते दि 10/05/2023 रोजी चे 09.00 वाजे पर्यंत पोलिस अंमलदार विशाल आण्णा पवार व सोबत पोअं सुतार टु मोबाईलवर ड्युटीला होते. त्यांना वरिष्ठांच्या आदेशाने नियमानुसार रात्रीनंतर पो.स्टे हद्दीतील आस्थापना बंद करण्यासाठी बाबत आदेश दिले होते.

त्यानुसार पोलिस अंमलदार विशाल आण्णा पवार व त्यांचे सहकारी पो.स्टे हद्दीत टु मोबाईल वाहनाने पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करून आस्थापना बंद करत असताना त्यांना टि व्ही सेंटर येथील सूर्या रेस्टारंट अँण्ड बार चालु दिसला. 11.15 वाजेच्या सुमारास सुर्या रेस्टारंट अॅण्ड बारच्या बाहेर असलेले वॉचमेन यांना पोलिसांनी आवाज देवून रेस्टारंट बंद करण्याची सूचना दिली. तेव्हा वॉचमॅन हो म्हणून पोलिसांजवळून निघुन गेले.

थोड्यावेळाने 11.45 वाजेच्या सुमारास पोलिस परत संभाजी चौक टि.व्ही सेंटर येथून टु मोबाईलसह आस्थापणा बंद करीत येत असताना सूर्या परमीट रुम येथे वॉचमॅन बसलेला होता. पोलिसांनी त्यास रेस्टारंट बंद करण्याच्या सूचना दिल्या असता रेस्टारंट मधून दोन जण बाहेर गेट वर आले. ते म्हणाले की तुम्ही आम्हाला दररोज येथे येवून रेस्टारंट बंद करता. आम्ही हॉटेल बंद करत नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणुन रेस्टारंट च्या गेट मधुन बाहेर येवून पोलिस रेस्टारंट समोर उभे असताना त्यातील एकाने पोलिसांना शिवीगाळ केली. पोलिस अंमलदार विशाल आण्णा पवार यांच्या अंगावर तो धावून आला.

पोलिस अंमलदार विशाल आण्णा पवार यांच्या शर्टाची कॉलर धरून जोरात ओढले. त्यात शर्टाच्या खिशाचे बटन तुटून लाईनयाड व शिट्टी तुटुन खाली पडली. त्याने पोलिस अंमलदार विशाल आण्णा पवार यांच्यासोबत झटापट केली. नंतर पोलिस अंमलदार विशाल आण्णा पवार यांच्या डाव्या पायाला लाथ मारली. त्यानंतर पोलिसांनी फोन व्दारे सिडको बीट मार्शल 112 यांना फोन करुन मदती करता बोलाविले. पोअ काळे, पोअं वाघ यांना बोलाविले ते तात्काळ त्या ठिकाणी आले असता त्यांचे मदतीने पोलिस अंमलदार विशाल आण्णा पवार यांनी त्या दोघांना पकडून टु मोबाईलमध्ये पोलीस ठाण्याला आणले.

त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मनिष कृष्णा राऊत (वय 34 वर्षे धंदा कुक सुर्या रेस्टारंट येथे रा. मुकुंदवाडी मुकंदनगर रेल्वेपट्टीरे बाजुला छत्रपती संभाजीनगर), 2)संतोष सुधाकर चौकडे (वय33 वर्षे धंदा कुक सूर्या रेस्टारंट येथे रा. हर्सुल धनगर गल्ली छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. पोलिस अंमलदार विशाल आण्णा पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!