छत्रपती संभाजीनगर
Trending

कर्ज घ्यायचे, करा अर्ज ! ग्रामपंचायत, महानगरपालिकेचे नाहरकत किंवा शॉप ॲक्ट परवाना असेल तर लागा कामाला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. 17 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) औरंगाबाद जिल्हा कार्यलयास 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष केंद्रीय अर्थसहाय योजना भोतिक उद्दिष्ठ -150 प्रकल्प मर्यादा 5000 तसेच आर्थिक उद्दिष्ठ रुपये 15 लाख आहे. तसेच बीजभांडवल योजना मध्ये 100 भोतिक उद्दिष्ठ आणि प्रकल्प मर्यादा 5 001 ते 70000 आहे तसेच आर्थिक उद्दिष्ठ 130 आहे या दोन योजनांचे कर्ज प्रस्ताव औरंगाबाद जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराकडून मागविण्यात येत आहेत.

जिल्हयातील मांग, मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराचे वय 18 वर्ष पुर्ण असावे व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 3 लाखा पेक्षा जास्त नसावी तसेच अर्जदाराने महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन कर्ज जातीचा दाखला, उत्पन्नचा दाखला, पॅन कार्ड झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, दोन पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाचे दर पत्रक (कोटेशन), व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे.

त्या ठिकाणी भाडेपावती, करार पत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा, (नमुना नं. 8, लाईट बील व टॅक्स पावती), बीज भांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, ग्रामपंचायत, महानगरपालिका यांचे नाहरकत किंवा शॉप ॲक्ट परवाना, वाहनासाठी लायसन्स, परवाने बॅचची आवश्यकता आहे. तसेच व्यवसाय संबंधीत तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभावाचा दाखल, शैक्षणिक दाखले, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र, स्व : घोषणापत्र इत्यादी. कर्ज मागणी प्रकरणा सोबतची सर्व कागदपत्रे स्वता:च्या स्वाक्षरीने साक्षांकीत करुन हा प्रस्तावाव दोन प्रतीत स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रांसह उपस्थीत राहून दाखल करावे. त्रयस्थ, मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही.

वरील योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहीत नमुन्यातील वाटप व प्राप्त अर्ज 1 जून ते 30 जून पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाही 10 ते 5 वार्जपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभव खोकडपुरा शिवाजी हायस्कुलच्या बाजुला, औरंगाबाद या ठिकाणी कर्ज मागणी अर्ज वाटप व स्वीकारले जातील.

Back to top button
error: Content is protected !!