पैठण
Trending

बिडकीन डिएमआयसी ऑरिक सिटीतील सुरक्षा रक्षकावर दगडफेक ! आठ जणांची दोघांना मारहाण केल्याचा आरोप !!

वाद सोडवायला गेलेल्या स्थानिकांना या प्रकरणात या सुरक्षा रक्षकांनी नाहक गोवले- अजय राठोड
  • गावातील हनुमान मंदिराजवळ दोघे तिघे जण बसलेलेल होते. याचदरम्यान रात्रीच्या सुमारास ते सुरक्षा रक्षक आले. मंदिराजवळ बसलेल्या दोघा-तिघांसोबत ते बोलायला लागले. याचवेळी त्यांच्यात वाद सुरु झाला. हा सर्व गोंधळ सुरु असताना तेथे स्थानिक जमा झाले. हा वाद मिटवण्यासाठी स्थानिकांनी मध्यस्थी केली. मात्र, या प्रकरणात या सुरक्षा रक्षकांनी स्थानिकांना नाहक गोवल्याचा आरोप अजय राठोड यांनी केला. त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये दिलेली फिर्याद ही खोटी असून असा प्रकार घडलाच नाही. उलट आम्ही तेथे वाद सोडवण्यास गेलो असता आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले, अशी माहिती अजय राठोड यांनी दिली.

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – बिडकीन डिएमआयसी ऑरिक सिटीतील सुरक्षा रक्षकावर दगडफेक करून आठ जणांनी दोघांना मारहाण केल्याचा आरोप सुरक्षा रक्षकांनी केला आहे. दरम्यान हे आरोप धादांत खोटे असून मंदिराजवळ सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या स्थानिकांना सुरक्षा रक्षकाने या प्रकरणात नाहक गोवले असा आरोप स्थानिकांनी केला आहे. एकंदरीतच या प्रकरणाची सत्यता पोलिस तपासत आहे.

अनिल उत्तम राठोड (वय 27 वर्षे व्यवसाय सुरक्षा रक्षक, डिएमआयसी, बिडकीन रा. बंगला तांडा ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर) व त्यांचे सहकारी मंगेश सुभाष राठोड (रा नांदलगाव तांडा) अशी जखमींची नावे आहेत.

अनिल उत्तम राठोड (वय 27 वर्षे व्यवसाय सुरक्षा रक्षक, डिएमआयसी, बिडकीन रा. बंगला तांडा ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, डिएमआयसी ऑरिक सिटी बिडकीन येथे सुरक्षा रक्षक म्हणुन सुमारे एक वर्षापासून ते काम करतात. सुरक्षा रक्षक अनिल उत्तम राठोड यांची नेहमी रात्र गस्त डयुटी असते. संध्याकाळी 07.00 ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत ते डयुटीवर असतात.

दि 18/05/2023 रोजी सुरक्षा रक्षक अनिल उत्तम राठोड हे संध्याकाळी 07.00 वाजता डिएमआयसी (ऑरीक सीटी) नरसींग तांडा डी 04 रोड ड्युटीवर होते. त्यांच्या सोबत सहकारी मंगेश सुभाष राठोड (रा नांदलगाव तांडा) असे दोघे जण डयुटीवर होते. रात्री 09.40 वाजेच्या सुमारास दोघेजण डीएमआयसी मध्ये गस्त घालीत असताना नरसींग तांडा डी 04 रोडजवळ तिघे जण 1. प्रकाश गोपीनाथ चव्हाण 2. अतुल देविदास चव्हाण 3. अजय राठोड सर्व (रा नरसींग तांडा) हे हातात काहीतरी घेवून जात असताना सुरक्षा रक्षक अनिल उत्तम राठोड यांना दिसले असता त्यांनी त्यांना हटकले.

सुरक्षा रक्षक अनिल उत्तम राठोड यांनी त्यांना विचारले की तुम्ही इथे काय करता असे विचारले असता तिघांनी सुरक्षा रक्षकास शिवीगाळ केली. त्यानंतर प्रकाश चव्हाण यांनी दगड फेकून सुरक्षा रक्षक अनिल उत्तम राठोड यांच्या उजव्या मांडीवर मारला. त्यांचे सहकारी मंगेश राठोड यांनाही शिवीगाळ करून धमकावले.

दरम्यान, सुरक्षा रक्षक अनिल उत्तम राठोड यांची प्रकाश चव्हाण, अतुल चव्हाण व अजय राठोड यांच्या सोबत हातापायी चालू असतांना त्यांनी त्याचे मित्र 4. मनोज राठोड 5. करण राठोड (रा. नरसींग तांडा ह मु बिडकीन व ईतर तीन जण) यांना आवाज देवून बोलावले. ते सर्व घटनास्थळी आले. सर्वांनी मिळून सुरक्षा रक्षक अनिल उत्तम राठोड यांना मारहाण केल्याचा आरोप सुरक्षा रक्षकांनी केला आहे.

मनोज करण राठोड यांनी सुरक्षा रक्षक अनिल उत्तम राठोड यांच्या डोक्यावर पाठीवर काठीने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्यांनी दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची गाडी पोहोचली. त्यानंतर जखमी सुरक्षा रक्षक अनिल उत्तम राठोड यांच्यासह त्यांचे सहकारी यांना सरकारी दवाखाना बिडकीन येथे उपचारासाठी दाखल करून प्राथमोपचार करून ते घरी गेले.

याप्रकरणी सुरक्षा रक्षक अनिल उत्तम राठोड यांनी दिलेल्या प्राथमिक तक्रारीवरून 1. प्रकाश गोपीनाथ चव्हाण 2. अतुल देविदास चव्हाण 3. अजय राठोड सर्व (रा नरसींग तांडा), 4. मनोज राठोड 5. करण राठोड (रा. नरसींग तांडा ह मु बिडकीन व ईतर तीन जण) यांच्याविरोधात बिडकीन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी केलेले आरोप हे धादांत खोटे असून अजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. उलट आम्ही मंदिरासमोर सुरु असलेला वाद सोडवायला गेलो होतो. मात्र, सुरक्षा रक्षकांनी या प्रकरणात आमचे नाव नाहक गोवले, असेही अजय राठोड यांनी संभाजीनगर लाईव्हला फोन करून सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!