सिल्लोड
Trending

सिल्लोडच्या हॉटेल कस्तुरी प्लाझा बिअर बारमध्ये राडा, टेरेसवर बर्थडे ! अफजल खान व औरंगजेबविरोधी घोषणा दिल्याने ४० मुलांचा हॉलेवर हल्लाबोल, पोलिसांचे शांततेचे आवाहन !!

पोलिसांचे शांततेचे आवाहन

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – टेरेसवर वाढदिवस साजरा करत असताना अफजलखान व औरंगजेबविरोधी घोषणा दिल्याने परिसरातील ४० ते ५० मुलांनी हॉटेलवर हल्ला चढवला. लाथा बुक्याने व काठीने मारहान केल्याने हॉटेलचे मॅनेजर व कामगार यात जखमी झाले. हॉटेलमधील खुर्च्या व टेबलची मोडतोड करून मोठ्या प्रमाणात नासधूस त्यांनी केली. ही घटना रात्री 09.30 वाजेच्या सुमारास भोकरदन नाका ते औरंगाबाद नाका या रोडवर हॉटेल कस्तुरी प्लाझा बिअर बार सिल्लोड येथे रात्रीच्या सुमारास घडली.

हॉटेलचे मॅनेजर नामदेव धोंडीबा खिरडकर (वय 45 वर्षे व्यवसाय हॉटेल कस्तुरी प्लाजा हॉटेल चालक सिल्लोड ता. सिल्लोड जि.औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरून हॉटेलवर हल्ला चढवणार्या ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय बर्थडे साजरा करणार्या ४ जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिल्लोड शहर पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार रामानंद त्रिंबक बुधवंत यांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दिनांक 20/05/2023 रोजी रात्री 09.30 वाजेच्या सुमारास भोकरदन नाका ते औरंगाबाद नाका या रोडवर हॉटेल कस्तुरी प्लाजा बिअर बार सिल्लोड येथील हॉटेलचे मॅनेजर व कामगार यांना अंदाजे चाळीस ते पन्नास मुलांनी एकत्र येवून लाथा बुक्याने व काठीने मारहान करुन जखमी केले. हॉटेलमधील खुर्च्या व टेबलची मोडतोड करुन मोठ्या प्रमाणात नासधूस केली.

यासंदर्भात पोलिसांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर घटनेच्या अगोदर सदर हॉटेलमध्ये सुनील कैलास वडगावकर (वय 33 वर्षे व्यवसाय शेती रा. आन्वा ता. सिल्लोड ह.मु.शिवाजीनगर सिल्लोड ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) याचा वाढदिवस असल्याने त्याच्या सोबत त्याचे मित्र संदीप जनार्देन पिसाळ (वय 26 वर्षे व्यवसाय मो.सा. गॅरेज मॅकेनिक रजाळवाडी सिल्लोड), विजय आण्णा जंजाळ (वय 30 वर्षे व्यवसाय मजुरी रा. मानेवाडी सिल्लोड), आकाश प्रकाश माने (22 वर्षे, व्यवसाय शेती रा. मानेवाडी सिल्लोड) हे सदर हॉटेलच्या टेरेसवर वाढदिवस साजरा करत होते.

मोठ-मोठ्याने गाणे गात होते. मोठ-मोठ्याने महापुरुषाच्या नावाने घोषणा देत होते. तसेच अफजलखान व औरंगजेब यांच्या विरोधी घोषणा देत होते. त्यामुळे हॉटेलच्या पाठी मागील चर्चपरिसर वस्तीतील मुलांनी हॉटेलच्या टेरेसवर दगडफेक केली. त्यानंतर वाढदिवस साजरा करनारे मुले निघुन गेले परंतु त्यांच्या घोषनामुळे दोन समाजात तेड निर्मान होऊन शत्रुत्वाची भावना निर्माण झाल्याने 40 ते 50 मुलांनी हॉटेलचे मॅनेजर व कामगार यांना मारहाण केली. शिविगाळ करुन हॉटेलच्या खुर्च्या व टेबलची मोडतोड करून नासधूस केली.

दरम्यान, हॉटेल मालकाच्या फिर्यादीवरून हल्ला करणारे ५० ते ६० जण होते तर पोलिसांनी त्यांच्या सोर्सकडून घेतलेल्या गोपनीय माहितीनुसार ४० ते ५० मुलांनी हॉटेलवर हल्ला केला. सिल्लोड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!