देश\विदेश
Trending

बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता, रेड अलर्ट जारी !

पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवर अलर्ट जारी

नवी दिल्ली, दि. ११ -: बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रावर ताशी 5 किमी वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. पुढील काही तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 15 जून रोजी पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ बिपरजॉय तीव्र होत असल्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. चक्रीवादळ महानगराच्या दक्षिणेस सुमारे 900 किलोमीटर अंतरावर असल्याचा अंदाज पाकीस्तानात व्यक्त करण्यात येत आला. कराची पोर्ट ट्रस्टने चक्रीवादळामुळे जहाजे आणि बंदर सुविधांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

शिपिंग क्रियाकलाप थांबवल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. जोरदार वारे वाहत असल्याने शिपिंग क्रियाकलाप बंद राहतील. याशिवाय वाऱ्याचा वेग जास्त अल्यास मालवाहू जहाजांची वाहतूकही ठप्प राहील. वादळाचा प्रभाव पाहता रात्री जहाजांची वाहतूक ठप्प राहील.

यापूर्वी कराची प्रशासनाने अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉयच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कलम 144 अंतर्गत समुद्रात मासेमारी, नौकाविहार, पोहणे आणि आंघोळीवर बंदी घातली होती. जहाज बुडू नये किंवा कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!