छत्रपती संभाजीनगर
Trending

मनुष्यबळ विकास केंद्राचे वार्षिक वेळापत्रक जाहीर ! नवीन वर्षातील कार्यक्रमही ऑनलाईन, २५ अभ्यास वर्गांना मान्यता !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.१२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मनुष्यबळ विकास केंद्रात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी २५ अभ्यास वर्गांना मान्यता मिळाली असून सर्व वर्ग ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत, अशी माहिती संचालक डॉ.धनश्री महाजन यांनी दिली.

या केंद्राच्या मार्फत नवीन शैक्षणिक वर्षात होणा-या अभ्यास वर्गांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मंजूरी मिळाली आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मान्यतेने वर्षभरातील अभ्यास वर्ग, समन्वयक व तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३ जुलै पासून ’फॅक्लटी इंडक्शन’ कार्यक्रम सत्र सुरु होईल. तर ऑक्टोबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात हा कोर्स होईल.

योगशास्त्र, संशोधन पध्दती, पीएच.डी संशोधकासाठी कार्यशाळा, शेअर बाजार, कार्य संस्कृती व कर्मचा-यांची ’शॉर्ट टर्म’ कोर्स होणार आहेत. केंद्राचे सहसंचालक डॉ.मोहम्मद अब्दुल राफे हे समन्वयक आहेत. सात आंतरविद्याशाखील अभ्यासक्रम व चार बहुविध शाखीय उजळणी वर्ग असे २५ अभ्यासक्रम होणार आहेत. तसेच प्राचार्य व विद्यापीठातील विभागप्रमुखांची कार्यशाळा ही घेण्यात येणार आहे.

प्रत्येक वर्गास ४० जण सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षात २०२२-२३ एकूण १६ अभ्यास वर्ग झाले. यामध्ये ४५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्राचार्यांच्या कार्यशाळेत १५० जणांनी सहभाग घेतला, अशी माहिती संचालक डॉ.धनश्री महाजन यांनी दिली. या अभ्यासक्रम वर्गांच्या यशस्वीतेसाठी सहसंचालक डॉ.मोहम्मद अब्दुल राफे यांच्यासह सहकारी प्रयत्नशील आहेत. देशभरताील विविध विद्यापीठ, महाविद्यालयाचे प्राध्यापक यात सहभागी होणार आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे बदल : कुलगुरु
मनुष्यबह विकास केंद्राच्या या अभ्यासवर्गात नवनी शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने बदल करण्यात आले आहेत. विशेषतः योगा, आयसीटी, शाश्वत विकास, कायदा व समाज, इ-कंटेर, मुक अभ्यासक्रम इंडिया नॉलेज सिस्टीम, अनुवाद आदी विषयांचा समावेश या अभ्यास वर्गात करणत अल्याची प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!