बीडमध्ये दोन गट भिडले, गावठी कट्यातून अंधाधुंद गोळीबार ! तलवार, लाठ्या काठ्यांनी हल्लाबोल, पोलिसांचा सौम्य बळाचा वापर !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – बीड शहात रात्रीच्या सुमारास दोन गट भिडले. गावठी कट्यातून अंधाधुंद गोळीबार, तलवार, लाठ्या काठ्यांनी हल्लाबोल करण्यात आला. माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळ गाठून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार चौघे जखमी झाले. पोलिसांनी सुमारे ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कालिंका नगर कमान बीड या ठिकाणी आसाराम गायकवाड व सुभाष जाधव गटांत ही हाणामारी झाली.
यासंदर्भात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गणेश गुरले (पोलीस स्टेशन शिवाजी नगर बीड) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 16/06/2023 रोजी रात्री 22.15 वाजेच्या सुमारास त्यांना पोस्टे शिवाजी नगर बीड प्रभारी अधिकारी पो नि केतन राठोड यांनी मोबाईलवर कॉल करून कळवले की कालिका नगर कमान बालेपीर नगर रोड बीड येथे दोन गट जमा झाले असून त्यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गुरले व पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाकडे जात असतानाच त्यांनी अन्य पोलिसांची कुमक मागवली.
कालिंका नगर कमान जवळील नगद नारायण अर्बनच्या समोर 25 ते 30 जणांचे दोन गट आपसात झुंज करून हाता चापटाने मारहाण करत होते. त्यानंतर त्यांच्या पैकी आसाराम गायकवाड गटाचे विपुल गायकवाड यांनी त्याच्या कमरेला असलेला गावठी कट्टा काढून सुभाष जाधव गटाच्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला व त्याचे पैकी दीपक गायकवाड यांनी त्याच्या हातातील तलवारीने जाधव गटाच्या लोकांवर वार करीत असल्याचे पोलिसांना दिसले.
जाधव गटाकडून संतोष सुरेश जाधव हा सुद्धा आसाराम गायकवाड गटाच्या लोकांवर वार करीत असताना चराटा फाट्याकडून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट (युवा सेना जिल्हाप्रमुख असे लिहिलेले) व त्यातून काही जण हातात काठ्या व तलवार घेऊन जमावाच्या दिशेने जात होते. पोलिसांनी सदर जमावास पांगापांग करण्यासाठी सौम्य बाळाचा वापर करून जमाव पांगवला. सर्व जमाव हा तेथून निघून गेला. घटनास्थळावर चार जण जखमी पडलेले दिसले व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खाजगी वाहनाने सरकारी दवाखान्याकडे घेऊन गेले.
दिनांक 16/6/2023 रोजी 22.25 वाजेच्या सुमारास कालिंका नगर कमान बीड या ठिकाणी आसाराम गायकवाड व सुभाष जाधव गटांत गावठी कट्टा, तलवार, लाठ्या काठ्यांनी व लोखंडी रॉडने एकमेकांवर जीव घेणा हल्ला करण्यात आला. गोळीबार, तलवार, लाठ्या काठ्याच्या हल्ल्यात काही लोक जखमी झाले. सदर घटनास्थळाच्या आजुबाजुच्या लोकांकडून सदर गुन्हयातील पाहिजे असलेल्या (वॉन्टेड) आरोपीतांची गोपनिय माहीती काढून आरोपींची नावे निष्पन करण्यात आलेली आहेत.
1. आसाराम जगन्नाथ गायकवाड 2. विपुल आसाराम गायकवाड 3. अमर आसाराम गायकवाड 4. ऋषी आसाराम गायकवाड 5. मारुती जगन्नाथ गायकवाड 6. संभा मारुती गायकवाड 7. बल्ल्या मारुती गायकवाड 8 निखिल सपकाळ 9. संतोष सुरेश जाधव 10. निलेश सुरेश जाधव 11. सुरेश रामलाल जाधव 12. प्रदीप विष्णू गायकवाड 13. दीपक विष्णू गायकवाड 14. विष्णू रामभाऊ गायकवाड 15. अशोक गायकवाड 16. परसराम गौतम गायकवाड 17. प्रवीण गौतम गायकवाड 18. सुभाष चंद्रकांत जाधव 19. सुमित कोळपे व इतर 15 ते 20 अनोळखी लोकांविरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe