संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजश्री शाहू महाराज जयंती अर्थात सामाजिक न्यायदिनानिमित्त निमित्त सोमवारी (दि.२६) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रख्यात विचारवंत, माजी कुलगुरू माध्यमतज्ञ डॉ.सुधीर गव्हाणे यांचे व्याख्यान होणार आहे. महात्मा फुले सभागृहात मंगळवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वसंतराव नाईक अध्यासन केंद्राचे संचालक संचालक प्रा.पराग हासे, राजश्री शाहू महाराज संशोधन केंद्र संचालक डॉ.कावेरी लाड यांनी केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe