देश\विदेशराजकारण
Trending

महाराष्ट्रात तलाठ्यांना हटवणार, त्यांचे अन्यत्र समायोजन करणार ! आमचा पक्ष भाजपाची बी टीम नाही तर शेतकऱ्यांची ए टीम: मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव

तलाठ्यांनी लुटमार चालवली आहे, तलाठी हटाव ही जनतेची पुकार: मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव

पंढरपूर, दि. २७ – केंद्र सरकारने डीजिटल योजना आणली. याची अंमलबजावणी तेलंगणाने केली. माहाराष्ट्राने का केली नाही ? तलाठ्यांनी लुटमार चालवली आहे. तलाठी हवा की नको, त्यांचे पद बरखास्त करावे का, असे प्रश्न जनतेला विचारले. त्यावर जनतेमधून उत्स्फूर्त उत्तर मिळाले. जरा प्रमार माध्यमांनी जनतेकडे आपले कॅमेरे फिरवावे. बघा त्यांना काय हवंय. मी ज्या ज्या भागांत जातो त्या भागातील नागरिक तलाठ्यांबद्दल मतं जाणून घेतो. तलाठ्यांच्या पोटावर पाय देण्याची आमची भूमीका नाही. त्यांचे अन्य विभागात समायोजन करण्यात येईल. मला तलाठ्यांची मतं मिळाली नाही तरी चालतील परंतू सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय मी घेणार. तलाठी हटाव ही जनतेची पुकार आहे. महाराष्ट्रात सातबारा जसा एका कागदावर दिला जातो तसा तेलंगणामध्ये दिला जात नाही. एका पासबुकप्रमाणे तो दिला जातो. सातबारा डीजिटल करणार. तेलंगणामध्ये तलाठीच काय अन्य कोणत्याही अधिकार्याला सातबार्यात बदल करता येत नाही. केवळ शेतकरी त्यांच्या अंगठ्याद्वारेच (थंब) तो स्वत बदल करू शकतो. तेलंगणासारख्या या डीजिटल योजना महाराष्ट्रात आणणार अशी ग्वाही भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिली. बीआरएसच्या प्रवेशामुळे भाजपा, राष्ट्रवादीसह प्रस्थापीत पक्षांच्या पोटात गोळा आला असून आम्ही कोणाचीही बी टीम नसून आम्ही शेतकऱ्यांची ए टीम असल्याचा पलटवारही के चंद्रशेखर राव यांनी केला.

गेल्या काही महिन्यांपासून बीआरएसने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याच अनुषंगाने सुमारे ५०० ते ६०० गाड्यांचा ताफा घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पुंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले आहे. विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्यांनी पंढरपूरच्या सरकोलीमध्ये शेतकरी मेळावा घेऊन सत्ताधारी भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य पक्षांचा समाचार घेतला. यावेळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष प्रवेश केला. जनतेला संबोधित करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, गेल्या ५० वर्षांपासून कॉंग्रेस सत्तेमध्ये आहे. महाराष्ट्रासाठी कॉंग्रेसने काय केले असा सवाल करून त्यांनी मेळाव्याला आलेल्या जनतेला प्रश्न विचालले की महाराष्ट्रात वीज मोफत दिली जाते का, पूर्ण वेळ वीज मिळते का, रोज प्यायचे पाणी मिळते का, तलाठी हवा की नको असे प्रश्न विचारले. यावर जनतेमधून उत्स्फूर्त उत्तरे मिळाली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले की के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रात काय काम, पण मी फडणवीस यांना सांगू इच्छितो की आमचा पक्ष तेलंगणापुरता मर्यादित नाही. गेल्या काही दिवसांपासून मी पाहतो आहे की महाराष्ट्रातील सर्वच पक्षाच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. कॉंग्रेस म्हणते आम्ही भाजपाची बी टीम. मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही बी नाही तर शेतकर्यांची ए टीम आहोत.

मी राज्यातील अनेक भागांत गेलो. तेथील अनेक नागरिकांशी मी संवाद साधला. तलाठी हवा की नको, यावर जनतेमध्ये तलाठ्यांबद्ल नाराजीचा सूर आहे. तेलंगणामध्ये तलाठी नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात करू. मला तलठ्यांच्या पोटावर पाय द्यायचा नाही. त्यांचे अन्य विभागात समायोजन करू. मला हेही माहित आहे की माझ्या पक्षाला तलाठी मतदान करणार नाही. परंतू महाराष्ट्रात तेलंगणाप्रमाणे डीजिटल राज आणणार, अशी ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली. छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर शहारांतील पाणीप्रश्नावरही त्यांनी सडकून टीका केली.

Back to top button
error: Content is protected !!