छत्रपती संभाजीनगर शहराला मुसळधार पावसाने झोडपले, मिटमिट्यात मुलगी वाहून गेली ! चिकलठाण्यात कंपनीला आग, जिल्हा परिषदेच्या बाजूला मृतदेह आढळल्याने खळबळ !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २- शहर व परिसरात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने ग्रामीण भागातील प्रतीक्षेत असलेल्या बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. शक्य त्या ठिकाणी मनपाची यंत्रणा पोहोचली व साचलेल्या पाण्याला मार्ग मोकळा करून दिला. दरम्यान, चिकलठाण्यात कंपनीला आग लागली असून जिल्हा परिषद मैदान विसर्जन विहिरीच्या बाजूच्या नाल्यामध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आज संध्याकाळी शहरात झालेले मुसळधार पावसामुळे कासमबरी दर्गा मिटमिटा येथे एक मुलगी वाहून गेली तर शहरातील विविध ठिकाणी पाणी साचणे आणि एका ठिकाणी झाड पडल्याची तसेच कटकट गेट येथे नाल्यावरचा पुलाची एक भिंत खचल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली आहे.
कासम बररी दर्गा येथे ताज पुलाच्या बाजूला नाल्यात एक मुलगी पाहून गेली आहे अशी माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमनच्या एक पथक घटनास्थळी ताबडतोब रवाना झाला आहे. नंदनवन कॉलनी येथे प्लॉट क्रमांक ७२ अंडरग्राउंड मध्ये पाणी तुंबल्याची तक्रार होती. घटनास्थळी पथक रवाना करण्यात आले आहे.
याशिवाय कालडा कॉर्नर येथे वैष्णवी अपार्टमेंट मध्ये पाणी शिरले. पेठे नगर प्लॉट क्रमांक 86, उल्कानगरी विठ्ठल रुख्मिण मंदिर समोर पाणी साचले होते. या ठिकाणी पाणी काढण्यात आल्याची माहिती आहे. पाणी साचलेल्या इतर ठिकाणी पथक रवाना झाले आहे. सर्व ठिकाणांवरून पंपामार्फत पाणी उपसण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती मनपा पथकाने दिली.
याशिवाय चिकलठाणा एमआयडीसी भागात एका फर्निचर कंपनीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आग विजविण्यासाठी पथक रवाना झाले आहे. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक गुलमोहरच्या झाड रस्त्यावर उन्मळले आहे असे कॉल मिळताच एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि झाड रस्त्याच्या बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. याशिवाय पोलिस कंट्रोल रूम यांच्याकडून मिळालेली सूचनानुसार जिल्हा परिषद मैदान विसर्जन विहिरीच्या बाजूच्या नाल्यामध्ये एक मृतदेह सापडला आहे. तो मृतदेह काढण्यासाठी अग्निशमनचे एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe