राजकारण
Trending

राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय १०० (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींचा निधी देण्याची डिल: अंबादास दानवे

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय १०० (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच.. पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का? असा सवाल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील उभी फूट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. बरोबर अगदी एक वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडून शिंदे गटाने भाजपाबरोबर जावून सत्ता स्थापन केली. दरम्यान, एक वर्षाने म्हणजे आता भाजपा शिंदे गटाकडे पुरेसे संख्याबंळ असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपा शिंदे सेनेबरोबर सत्तेत सहभागी होवून महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे राष्ट्रवादीतील छुपी बंडाळी महाराष्ट्रासमोर आली.

यासर्व राजकीय घडामोडींवर शिवसेना नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर सूचक प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचा उल्लेख करून भाजपावर नामोल्लेख टाळून टीका केली. राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय १०० (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच.. पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का? असा सवाल दानवे यांनी केला.

Back to top button
error: Content is protected !!