महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविकांनी Covid 19 कसोटीच्या काळात दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही !

अमरावती, दि. १३ – कोरोनाच्या कसोटीच्या काळात अंगणवाडी सेविकांनी दिलेले योगदान हे कधीच विसरता येणार नाही असे प्रतिपादन माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. भातकुली तालुक्यातील चांगापूर येथे आयोजित कार्यक्रमात ठाकूर बोलत होत्या.

आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर, परिचारीका यांचा सन्सान त्यांनी केला. लोकनेते माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून भातकुली तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर यांच्या कर्तव्याप्रती कृतज्ञता म्हणून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

चांगापूर येथे या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो अंणवाडी सेविकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमप्रसंगी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविकांप्रती गौरवोदगार काढले. कोरोनाच्या कसोटीच्या काळात त्यांनी दिलेले योगदान हे कधीच विसरता येणार नाही असेही ठाकूर यावेळी म्हणाल्या.

Back to top button
error: Content is protected !!