अजितदादाचा पॉवर गेम: शिंदे गटातील आमदारांच्या विरोधानंतरही अजित पवारांनी मिळवले वित्तखाते ! राष्ट्रवादीमुळे अनेक मंत्र्यांच्या खात्यांची खांदेपालट, वाचा सविस्तर यादी !!
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुंबई, दि. १४: महाविकास आघाडीत अर्थखातं साभाळणारे अजित पवार यांनी आम्हाला निधी दिला नाही असा सूर लावून शिंदे गटाने शिवसेनेतून केलेले बंड उभ्या महाराष्ट्राने पाहिले. शिंदे गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आरोपांची तुफान फटकेबाजी करत भाजपासोबत घरोबा केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसवर वर्षभर आरोपांच्या फैरी झाडल्या. परंतू एक वर्षानंतर राजकारणात पुन्हा ट्वीस्ट आला. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. मात्र, अजित पवारांना अर्थखातं मिळू नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांनी प्रचंड विरोध केला. शेवटी प्रकरण दिल्लीत पोहोचलं अन् दादांनी पॉवर वापरून अखेर वित्तखातं मिळवलं.
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांत बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe