आसारामजी भांडवलदार महाविद्यालयाच्या प्राध्यपकाचे पडेगावमधील घर फोडले ! प्राध्यापक दोन दिवस देवगाव रंगारीला मुक्कामी गेले, इकडे चोरट्यांनी घर साफ केले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ७- दोन दिवस देवगाव रंगारी येथे मुक्कामी गेलेल्या प्राध्यापकाचे पडेगावमधील घर चोरट्यांनी साफ केले. एकूण 344357/- रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. चोरीची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचून तपासाची चक्रे फिरवली आहेत. दिनांक 05/08/2023 ते दिनांक 06/08/23 दरम्यान चोरट्यांनी हा डाव साधला.
अमोल कृष्णा झीने (प्राध्यापक, राहणार आर्चिड होम सोसायटी, पडेगाव छत्रपती संभाजीनगर) यांच्या घरी ही चोरी झाली. प्राध्यापक अमोल झीने यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, ते आसारामजी भांडवलदार या शैक्षणिक संस्थेवर प्राध्यापक म्हणून नोकरी करतात. प्राध्यापक अमोल झीने यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने व त्यांची परीक्षा असल्याने ते त्यांच्या अर्चिड होम येथील घरी होते.
त्यानंतर कॉलेजचे काम निघाल्याने नेहमीच्या रूटीन प्रमाणे शुक्रवारी घराला लॉक लावून देवगाव रंगारी येथे ते गेले. शुक्रवार शनिवार तिथेच मुक्कामी राहिले. त्यानंतर दिनांक 06/08/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता प्राध्यापक अमोल झीने हे घरी आले असता घराचा दरवाजा तुटलेला त्यांना दिसला. त्यामुळे प्राध्यापक अमोल झीने यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यांनी लगेच पोलिस स्टेशनला फोन केला. पोलीस आले.
डॉग युनिटी यांनी डॉगच्या मार्फतीने घरात शोध घेतला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरल्याचे निदर्शनास आले. एकूण 344357/- रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
याप्रकरणी प्राध्यापक अमोल झिने यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe