जालना शहर व ग्रामीण भागातून बांधकामाचे साहित्य चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद ! तब्बल आठ गुन्हे उघडकीस, जिल्ह्यात घातला होता धुमाकूळ !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ८– जालना शहर व ग्रामीण भागात बांधकामाचे साहित्य चोरी करणारे दोन सराईत चोरटे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्या ताब्यातून एकूण 1,63,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सचिनसिंग बर्हामसिंग कलाणी वय (20 वर्षे), ज्वालासिंग रामसिंग कलाणी (वय 45 वर्षे, दोन्ही रा. गुरुगोविंदसिंग नगर जालना) अशी अटके केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जालना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सूचना दिल्या होत्या. त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी वेगळे पथके स्थापन करून पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत बारकाईने सूचना व मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार हे मालाविरुध्द गुन्हेगारांची माहिती घेत असताना बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस ठाणे तालुका जालना, सदर बाजार व चंदनझिरा हद्दीतील झालेले बांधकाम साहित्य चोरी बाबतचे गुन्हे हे सचिनसिंग बन्ऱ्हाामसिंग कलाणी (रा. गुरुगोविंदसिंग नगर जालना) याने त्याच्या साथीदारासह केले आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी 1) सचिनसिंग ब-हामसिंग कलाणी यास ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे बारकाईने गुन्ह्याबाबत व त्याच्या इतर साथीदारा बाबत माहिती विचारली असता त्याने त्याचे साथीदार ज्वालासिंग रामसिंग कलाणी व इतर दोन फरार आरोपी (सर्व रा. गुरुगोविंदसिंग नगर जालना) यांनी मिळून शहरातील व ग्रामीण भागातील वेगवेगळ्या ठिकाणी बांधकामाचे साहित्य ज्यात विद्युत वाहिनीचे लोखंडी मनोऱ्याचे साहित्य, लोखंडी सळ्या, जॅक पाईप, लोखंडी प्लेट असा एकूण 1,63,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांचे ताब्यातून जप्त केला. त्यांनी केलेले एकूण 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. दोन आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पोलीस ठाणे तालुका जालना येथे हजर करण्यात आले आहे पुढील तपास तालुका जालना, सदर बाजार, चंदनझिरा पोलीस हे करित आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe