छत्रपती संभाजीनगर
Trending

ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे अन् विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसणार, येलो अलर्ट जारी !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९- प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा (मुंबई) यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून सदर कालावधीत ताशी 30 ते40 किमी वेगाने वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व यंत्रणा व नागरिक, शेतकरी यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापण कक्षाने केले आहे.

महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने कालपासून पुनरागमन केले आहे. यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्यांच्या जीवात जीव आला आहे. पावसाअभावी करपलेली पिके काही प्रमाणात का होईना तरारण्याची आशा जिवंत झाली आहे. हा पाऊस पुढील काही दिवस असाच कोसळला तर पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या येलो अलर्टनुसार सर्वांनी खबरदारी घ्यावी.

या गोष्टी करा :

१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

(५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका:

१) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका..

४) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

Back to top button
error: Content is protected !!