महाराष्ट्र
Trending

बदनापूरचे भाजपा आमदार नारायण कुचेंचा रोहीलागड गावातील लोकांनी हुर्रे केला ! मराठा आरक्षणावरून युवक आक्रमक, कार्यक्रम अर्धवट सोडून आमदारांचा काढता पाय !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २- जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमधून मराठा आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरले असताना आता लोकप्रतिधींना युवकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याचाच प्रत्येय आज बदनापूर मतदार संघात दिसून आला. बदनापूर मतदारसंघातील रोहीलागड येथे भूमीपूजनाच्या कार्यक्रमास आलेल्या आमदार नारायण कुचे यांना युवकांनी धारेवर धरले. सभागृहात तुम्ही मराठा आरक्षणाची आग्रही मागणी केली असेल तरच आम्ही तुमच्या पाठीशी राहू असा पवित्रा घेतला. आक्रमक युवकांचा पवित्रा पाहत आमदार नारायण कुचे यांनी काढता पाय घेतला. त्यावेळी युवकांनी हुर्रे केला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नातून मौजे रोहिलागड (तालुका (अंबड) येथे 25 लक्ष रुपये निधीचा नवीन पशुवैद्यकीय दवाखाना बांधकाम करणे, ग्राम व 25/15 ग्राम विकास निधी अंतर्गत 15 लक्ष रुपयाच्या निधीचे हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करण्याच्या कामाचा भूमिपूजन आमदार नारायण यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी मराठा तरुण आक्रमक झाले व घोषणा देत हुर्रे केले. त्यामुळं कार्यक्रम अर्धवट सोडून आमदार नारायण कुचे यांना काढता पाय घ्यावा लागला.

दरम्यान, यावेळी मराठा युवकांनी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय आदी घोषणा यावेळी युवकांनी दिल्या. आरक्षणाच्या मागणीसाठी युवक आक्रमक होते. बदनापूर मतदारसंघाचे प्रतिननिधी म्हणून तुम्ही विधानसभेत किती वेळा मराठा आरक्षणावर आवाज उठवला, त्याची एखादी व्हिडियो क्लिप दाखवा आम्ही सर्व युवक तुमच्या पाठिशी उभा राहू असा सवाल युवकांनी आमदार नारायण कुचे यांना उपस्थित केला. युवकांचा आक्रमक पवित्रा पाहून आमदार नारायण कुचे यांनी रोहीलागड गावातून काढता पाय घेतला.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आर-पारची लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडतेवेळी राज्य सरकारला ३० दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्यानंतर आता सध्या मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र राज्याच्या दौर्यावर असून ठिकठिकाणी अभूतपूर्व मराठा समाजाच्या गर्दींने त्यांचे स्वागत होत आहे. आरक्षण मिळवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी भूमीका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे.

दरम्यान, आता लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणावरून जाब विचारण्यास सुरुवात झाली आहे. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांना आज युवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कार्यक्रम अर्धवट सोडून त्यांना काढता पाय घ्यावा लागला. हाच प्रकार भविष्यात अनेक मतदार संघात घडू शकतो त्याची सुरुवात बदनापूरपासून झाली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोप्रतिनिधींना गावात फिरकू देणार नसल्याचा इशारा अनेक गावांतील युवकांनी यापूर्वीच दिलेला आहे. त्याची सुरुवात बदनापूरपासून झाली.

Back to top button
error: Content is protected !!