छत्रपती संभाजीनगर
Trending

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेविदारांचे पैसे परत मिळणार, तब्बल ९२ कोटींच्या ६२ मालमत्तांसह घोटाळेबाजांचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती ! वाचा सविस्तर ५ महत्त्वपूर्ण मुद्दे, घोटाळ्याची व्याप्ती येईल लक्षात !!

आतापर्यंत कोट्यावधीची मालमत्ता जप्त; महाघोटाळेबाजा विरुध्द पोलीसांनी सबळ पुरावे केले हस्तगत - पोलीस आयुक्तांनी खासदार जलील यांना दिली माहिती

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ : संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणार्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील २०० कोटींच्या घोटाळ्यात मोठी अपडेट हाती आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ६२ स्थावर मालमत्तांची माहिती घेतली आली असून त्याची रेडिरेकनर दरानुसार किंमत ९० कोटी रुपये आहे. उर्वरीत मालमत्तेची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेचा लीलाव करून त्यातून मिळालेली रक्कम ठेवीदारांना देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळेबाजांवर कारवाई करून ठेवीदारांच्या ठेवी देण्यात याव्यात यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांसोबत विविध ठिकाणी तीव्र आंदोलन करून मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीवर भव्य मोर्चा सुध्दा काढला होता. तसेच लवकरात लवकर गोरगरीब ठेवीदारांची रक्कम परत मिळावी याकरिता पोलिस व इतर विभागांकडून होत असलेल्या कारवाईवर खासदार इम्तियाज जलील बारकाईने लक्ष देत असून विविध स्तरावर सतत बैठका घेवून पाठपुरावा करत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी आदर्श घोटाळा प्रकरणी आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीची मुद्देनिहाय सविस्तर माहिती खासदार इम्तियाज जलील यांना पत्राव्दारे कळवली आहे. पोलीस आयुक्तांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की,

१. सदर गुन्हयात आजपर्यंत आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक व इतर आरोपी एकूण १५ आरोपीतांना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून दोन्ही गुन्हयात तपास करण्यात आला आहे. यात सहनिबंधक कार्यालयाचे सतीष खरे यांचा देखील समावेश आहे.

२. आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिवज्योती कॉलनी एन ६ सिडको, छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे जाळे छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पसरलेले असून एकूण ४४ शाखा आहेत.

३. गुन्हयात गैरव्यवहार / गैरप्रकार झालेल्या कर्ज प्रकरणाच्या मुळ फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पतसंस्थेची तीन वाहने जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तीन आरोपीतांचे घरझडत्या घेवून तसे पंचनामे करण्यात आले आहे. मालमत्तेची माहिती मिळण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला असून ६२ स्थावर मालमत्तांची माहिती घेण्यात आली असून त्याची रेडीरेकनर दरानुसार किंमत ९० कोटी रुपये आहे. उर्वरीत मालमत्तेची माहिती प्राप्त करण्यात येत आहे.

४. सदर गुन्हयात ठेविदारांचे / खातेदारांची रक्कम परत मिळण्याकरीता एमपीआयडी कायदा १९९९ कलम ३ व ४ तसेच सहकलम २१ व २३ अनियंत्रीत जमा योजना प्रतिबंध कायदा २०१९ कायदयाप्रमाणे मालमत्ता संरक्षित करण्यासाठी मालमत्तेची माहिती मिळविण्याचे काम चालु आहे. त्यानंतर रितसर शासनाकडे प्रस्ताव सादर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

यातील नमूद अटक आरोपीताविरुध्द सबळ पुरावे हस्तगत झाल्याने त्यांचे विरुध्द मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र क्रमांक ३८६/२०२३, ३९१/२०२३ दिनांक ११/०९/२०२३ व दिनांक २३/०९/२०२३ अन्वये दाखल करण्यात आले असून सदरचे दोन्ही गुन्ह्याचा बारकाईने तपास करण्यात येत आहे व त्यावर आम्ही जातीने लक्ष ठेवून असल्याचे दिलेल्या पत्रात पोलीस आयुक्तांनी नमूद केले.

Back to top button
error: Content is protected !!