छत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

वैजापूर समृद्धी महामार्गावर १२ ठार प्रकरणात आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी ! RTOच्या गाडीतील अधिकाऱ्यांनी ट्रकला हात दाखवून बाजूला घेण्याचा इशारा केल्याने भीषण अपघात झाल्याचा गुन्हा दाखल !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६ – ट्रकवर पाठीमागून टेम्पो ट्रव्हलर धडकून वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील १२ ठार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आज वैजापूर कोर्टाने परिवहन विभागाचे (RTO) दोन सहाय्यक मोटर निरीक्षकांना एक दिवसाची तर ट्रक चालकाला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, RTOच्या गाडीतील अधिकार्यांनी त्या ट्रकला हात दाखवून बाजूला घेणाचा इशारा केल्यामुळे टेम्पो ट्रव्हलरच्यासमोर 120 कि.मी.च्या लेनमद्ये पुढे चालत असलेल्या ट्रकच्या चालकाने ट्रक अचानक पणे 80 किमी वेगमर्यादा असलेल्या लेनमध्ये भरधाव वेगात घेतली. त्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर ही जोरात ट्रकला पाठीमागून धडकल्याची माहिती जखमी ने पोलिसांना दिली. या प्रथम माहिती अहवालावरून परिवहन विभागाचे दोन अधिकारी व ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परिवहन विभागाचे सहाय्यक मोटर निरीक्षक प्रदीप छबुराव राठोड व सहाय्यक मोटर निरीक्षक नितीनकुमार सिद्धार्थ गोणारकर असे पोलिस कोठडी सुनावलेल्या आरटीओ अधिकार्यांची नावे आहेत. याशिवाय ब्रिजेशसिंग कमलसिंग संदेश असे ट्रक चालकाचे नाव आहे. ट्रक चालक हा मध्यप्रदेशातील आहे. या तिघांना काल रात्रीच अटक करण्यात आली होती. आज कोर्टात हजर करून पोलिसांनी तिघांना वैजापूर न्यायायलचाचे पोलिस कोठडीचे आदेश घेतले.

अपघातातील १२ मृतांची नावे 1.तनुश्री लखन सोळसे 2.संगीता विलास अस्वले 3. अंजाबाई रमेश जगताप 4.रतन जमदाडे 5.काजल लखन सोळसे 6.रजनी गौतम तपासे 7. हौसाबाई आनंदा शिरसाट 8. झुंबर काशिनाथ गांगुर्डे 9.अमोल झुंबर गांगुर्डे 10. सारिका झुंबर गांगुर्डे11. मिलिंद हिरामण पगारे 12.दीपक प्रभाकर केकाने.

अपघातातील २३ जखमींची नावे -1. पूजा दीपक अस्वले 2. ज्योती दीपक केकाने 3. माझी आई संगीता दगू मस्के 4. वैष्णवी संदीप अस्वले 5. संदीप रघुनाथ अस्वले 6. युवराज विलास साबळे 7. कमलबाई छबू मस्के 8. दगू सुखदेव मस्के 9. लखन शंकर सोळसे10. गिरजेश्वरी संदीप अस्वले 11. शांताबाई नामदेव म्हस्के 12. अनिल लहानू साबळे 13. तन्मय लक्ष्मण कांबळे 14. सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन 15. श्रीहरी दीपक केकाने 16. सम्राट दीपक केकाने 17. कमलेश दगू मस्के 18 गौतम भास्कर तपासे 19. कार्तिक लखन सोळसे 20. धनश्री लखन सोळसे 21. संदेश संदीप अस्वले 22. प्रकाश हरी गांगुर्डे 23. शंकर पूर्ण नाव माहित नाही

अपघातातील जखमीने पोलिसांना दिली आंखो देखी माहिती- अपघातातील जखमी कमलेश दगु म्हस्के (वय 32वर्षे, इंदिरा गांधी नगर, नाशिक) घाटी दवाखाना वार्ड क्र. 18 मध्ये उपचार घेत असताना पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून, संदीप अस्वले हा दुस-याच्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. दि. 13/10/2023 रोजी रात्री 08.00 वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्हातील सैलाणी बाबाच्या दर्शनासाठी जायचे असल्याने संदीप रघुनाथ अस्वले यांनी त्याच्या मित्राचा टेम्पो ट्रॅव्हलर क्र. MH-04 GP-2212 ही आणली होती. त्यामध्ये कमलेश म्हस्के, त्यांची आई संगिता म्हस्के वडील दगु म्हस्के, चुलत काका अनिल साबळे व अनिल साबळेचे नातेवाईक युवराज विलास साबळे, व चालक संदीप अस्वले याची पत्नी पूजा मुलगी वैष्णवी गीरीजाश्वरी व सासु शांताबाई नामदेव म्हस्के व त्यांचे नातेवाईक ज्यात ज्योती दीपक केकोणे,

कमलबाई छबु म्हस्के, लखन शंकर सोळसे, तन्मय लक्ष्मण कांबळे, सोनाली आप्पासाहेब त्रिभुवण, सम्राट दीपक केकाणे, तनुश्री लखन सोळसे, संगीता विलास अस्वले, अंजाबाई रमेश जगताप, काजल लखन सोळसे, रजणी गौतम तपासे, हौसाबाई आनंदा शिरसाठ, झुंबर काशीनाथ गागुर्डे, अमोल झुंबर गागुर्डे, सारीका झुंबर गांगुर्डे, मिलिंद पगारे, दीपक प्रभाकर केकाणे तसेच गौतम भास्कर तपासे कार्तिके लखन सोळसे, धनश्री लखन सोळसे, सदेश संदीप अस्वले, प्रकाश हरी गांगुर्डे व शंकर असे सर्व जण गांधीनगर नाशिक येथून रात्री 09.00 वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यांचे दर्शन घेण्यासाठी निघाले. त्यावेळी गाडी संदीप अस्वले हा चालवत होता.

सैलानी बाबाचे दर्शन घेवून रात्री ९ वाजता निघाले- हे सर्व जण दि 14/10/2023रोजी सकाळी 04.00 वाजेच्या सुमारास सैलानी बाबा येथे पोहोचले व दिवसभर तिथेच थांबून सैलानी बाबाचे दर्शन घेतले. रात्री 09.00 वाजेच्या सुमारास हे सर्वजण तेथून नाशिककडे जाण्यासाठी निघाले. रस्त्यात भोकरदन येथे एका हॉटेलमध्ये जेवन केले. व त्यानंतर चालक संदिप अस्वले यांनी गाडी समृद्धी महामार्गावर सावंगी नाका छत्रपती संभाजीनगर येथून वर घेतली. तेव्हा गाडीमध्ये कमलेश म्हस्के हे चालक संदिप अस्वले यांच्या पाठीमागील सिटवर बसले होते. सर्वजण गाडीत बसले होते.

टेम्पो ट्रॅव्हलर रोडच्या 80 KMवेग मर्यादा असलेल्या लेनवरून पुढे जात होता अन् आरटीओ अधिकार्यांनी हात दाखवला अन् घात झाला- टेम्पो ट्रव्हलर समृद्धी महामार्गाने नाशिककडे जात असताना दि. 15/10/2023 रोजी 00.45 वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील हडसपिंपळगाव टोलनाक्याच्या पुढे आली असता चालक संदीप अस्वले हा त्याच्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हलर रोडच्या 80 KMवेग मर्यादा असलेल्या लेनवरून चालवत पुढे जात होता. तेंव्हा टेम्पो ट्रव्हलरच्या समोर पुढे 120KM वेग मर्यादा असलेल्या लेनवर एक ट्रक पुढे चालत होता. त्यावेळी समोर काही अंतरावर रोडच्या बाजुला ऊभ्या असलेल्या RTOच्या गाडीतील लोकांनी त्या ट्रकला हात दाखवून बाजूला घेणाचा इशारा केल्यामुळे टेम्पो ट्रव्हलरच्यासमोर 120 कि.मी.च्या लेनमद्ये पुढे चालत असलेल्या ट्रकच्या चालकाने ट्रक अचानक पणे 80 किमी वेगमर्यादा असलेल्या लेनमध्ये भरधाव वेगात घेतली. त्यामुळे टेम्पो ट्रव्हलर ही जोरात ट्रकला पाठीमागून धडकली. त्यामुळे टेम्पो ट्रव्हलरचा चालक संदीप अस्वले याच्यासह गाडीतील सर्वजण जखमी झाले.

जखमींना वैजापूर व छत्रपती संभाजीनगरला हलवले- काही वेळानंतर लोकांनी व पोलिसांनी गाडीच्या बाहेर काढले. त्यावेळी जखमी कमलेश म्हस्के यांनी त्या ट्रकचा क्रमांक पाहिला असता त्या ट्रकचा क्र MP-09-HH-6483 असा दिसला व बाजुला काही अंतरावर 483.9अशा क्रमांकाचे बोर्ड रोडच्या बाजुला दिसला. त्यावेळी जखमींना अम्बुलन्समध्ये टाकून शासकीय दवाखाना वैजापूर येथे व त्यानंतर घाटी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारकामी दाखल केले. या अपघातामध्ये कमलेश म्हस्के उजव्या पायाला व तोंडाला मार लागून जखमी जाले आहे व कमरेला, खांद्याला मुकामार लागलेला आहे. तसेच गाडीमधील 1 ) तनुश्री लखन सोळसे 2 ) संगिता विलास अस्वले 3)अंजाबाई रमेश जगताप 4 ) रतन जमधडे 5) काजल लखन सोळसे 6) रजनी गौतम तपासे 7) हौसाबाई आनंदा शिरसाठ 8 ) झुंबर काशीनाथ गांगुर्डे 9)अमोल झुंबर गांगुर्डे 10) सारिका झुंबर गांगुर्डे 11) मिलींद हिरामन पगारे 12) दिपक प्रभाकर केकाणे यांचा मृत्यू झाला.

तसेच 1 पूजा दीपक अस्वले 2 ) ज्योती दीपक (कैकाने व कमलेश म्हस्के यांची आई 3 ) संगिता दगु म्हस्के हे गंभीर जखमी झाल्याने व 4) वैश्णवी संदीप अस्वले 5) संदीप रघुनाथ अस्वले 6) युवराज विलास साबळे 7 ) कमलबाई छबु म्हस्के 8 ) दगु सुखदेव म्हस्के 9 ) लखन शंकर सोळसे 10) गिरीजेश्वरी संदीप अस्वले 11 ) शांताबाई नामदेव म्हस्के 12 ) अनिल लहाणु साबळे 13) तन्मय लक्ष्मण कांबळे 14 ) सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन 15 ) श्रीहरी दीपक केकाने 16) सम्राट दिपक केकाने 17 ) कमलेश म्हस्के असे जखमी झाल्याने यांना घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे औषधोपचारकामी दाखल आहेत. 1) गौतम भास्कर तपासे 2 ) कार्तिक लखन सोळसे 3) धनश्री लखन सोळसे 4) संदेश संदीप अस्वले 5) प्रकाश हरि गांगुर्डे व 6) शंकर पुर्ण नाव माहित नाही असे जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर शासकीय दवाखाना वैजापूर येथे दाखल केले.

याप्रकरणी वैजापूर पोलिस स्टेशनमध्ये आरटीओ चे दोन अधिकारी सहाय्यक मोटर निरीक्षक प्रदीप छबुराव राठोड, सहाय्यक मोटर निरीक्षक नितीनकुमार सिद्धार्थ गोणारकर व ट्रक क्रमांक MP 09 HH 64 83 चा चालक ब्रिजेशसिंग कमलसिंग संदेश या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तपास पोनी सतीश वाघ (LCB) छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!