रेणुकादेवी मंदिरातील दानपेटीवर टोपले ठेवले, भाविकांना दानपेटीमध्ये पैसे टाकण्यासाठी अडथळा निर्माण केला ! जाब विचारला म्हणून धक्काबुक्की, पुजाऱ्यांवर पाचोड पोलिसांत गुन्हा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – पैठण तालुक्यातील चौढाळा येथील रेणुकादेवी मंदिरातील दानपेटीवर टोपले ठेवले. भाविकांना दानपेटीमध्ये पैसे टाकण्यासाठी अडथळा निर्माण केला याचा जाब विचारला म्हणून धक्काबुक्की केल्याची फिर्याद ट्रस्टीने दिल्यानंतर पुजार्यांवर पाचोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदामराव रंगनाथराव येवले (वय 56 वर्षे, व्यवसाय शेती, रा. चिंचाळा ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते दिनांक 18/10/2023 रोजी सकाळी 09.00 वाजेपासून ट्रस्टी असल्यामुळे चौढाळा येथील रेणुकादेवी मंदिराच्या संभामंडपात खुच्या टाकून बसलेले होते. दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास सुदामराव रंगनाथराव येवले यांच्या ओळखीचे पोलिस अधिकारी तेथे दर्शनाला आले होते. दर्शन घेतल्यानंतर ते निघून गेले.
त्यानंतर तेथील पुजारी 1) कमलाकर देवीदास वानोळे 2) प्रकाश देवीदास वानोळे दोन्ही रा. चौंढाळा मंदिर यांनी मंदिराच्या दानपेटीवर टोपले ठेवले होते. तेंव्हा सुदामराव रंगनाथराव येवले हे त्यांना म्हणालो की, दानपेटीवर टोपले ठेवू नका, लोकांना पैसे टाकण्यासाठी दानपेटी दिसत नाही. यावर दोघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकाने धक्काबुक्की केली व अंगावर धावून आले. सदर दानपेटी ही तहसिलदार, पैठण यांच्या आदेशाने ठेवण्यात आली होती व सदर मंदिराच्या देखरेखीसाठी कायदेशीर ट्रस्ट स्थापन केली असल्याचे सुदामराव रंगनाथराव येवले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी सुदामराव रंगनाथराव येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कमलाकर देवीदास वानोळे, प्रकाश देवीदास वानोळे व तुषार बापुसाहेब वानोळे यांच्याविरोधात पाचोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe