छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनीवरील २३ अनधिकृत नळ तोडले ! इंदिरानगर बायजीपुऱ्यात महानगरपालिकेची कारवाई !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.२७ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अनाधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून इंदिरा नगर, बायजीपुरा येथील तब्बल २३ अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यात आले. यामुळे अनधिकृत नळ जोणडी घेणार्यांचे धाबे दणाणले आहे. प्लंबरला हताशी धरून या अनधिकृत नळ जोडण्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथकचे प्रमुख मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्या अधिपत्त्याखाली इंदिरा नगर, बायजीपुरा येथील गल्ली क्रं. ३१ मध्ये जी. व्हि. पी. आर कंपनी मार्फत नव्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके साठी टाकण्यात आलेल्या HDPE १६० मिमी जलवाहिनी वरील एकूण २३ अनधिकृत नळ खंडित करण्यात आले.

यामध्ये अनधिकृत नळ जोडणी सोबतजे नळ रीतसर kit द्वारे घेतले नसेल किंवा चुकीच्या पद्धतीने घेतले असले तरी देखील खंडित करण्यात आले. सदरील ठिकाणी नागरिकांनी अज्ञात अनधिकृत प्लंबरद्वारे नळ जोडणी घेतल्याचे निदर्शना आले. शहरात अनेक ठिकाणी असे HDPE जलवाहिनी टाकण्याचे काम चालू असतांना असे अनुचित प्रकार घडत असल्याच्या तक्रारी पथकाला प्राप्त झाल्याने महानगरपालिकेच्या वतीने ही माहीम हाती घेण्यात आली आहे.

ही कार्यवाही ही उप अभियंता महेश चौधरी, पथक अभियंता रोहीत इंगळे, कनिष्ठ अभियंता भूषण देवरे, पथक कर्मचारी वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, मो. शरीफ, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार आदींनी पूर्ण केली.

Back to top button
error: Content is protected !!