महाराष्ट्र
Trending

मनोज जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा, शेवटचं सागंतो… मराठ्यांची लेकरं मरत असताना राज्य सरकारने मजा पाहू नये ! उद्यापासून गावा गावांत हजारोंच्या संख्येने आमरण उपोषणाचा एल्गार !!

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा अंतरवाली सराटीतून राज्य सरकारला अल्टिमेटम, आम्ही राजकीय नेत्याच्या दारात जाणार नाही त्यांनीही आमच्या दारात येवू नये

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा आमरण उपोषणास बसलेल्या संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेवून राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देत सुनावलं की, शेवटचं सांगतो मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्या. मराठ्यांली लेकरं मरत असताना राज्य सरकारने मजा पाहू नये. आज सायंकाळपर्यंत राज्य सरकारचे उत्तर न आल्यास उद्यापासून म्हणजे २९ ऑक्टोबर पासून गावागावांतील मराठा समाज बांधव हजारोंच्या संख्येने आमरण उपोषणाल बसणार आहे. दुसर्या टप्प्यातील या आमरण उपोषणाची घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केली. दुसर्या टप्प्यातील आमरण उपोषण हे २९ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर तिसर्या टप्प्यातील आंदोलन हे ३१ ऑक्टोबर पासून सुरु होणार असून त्याची माहिती ही ३० ऑक्टोबर रोजी मराठा समाज आणि राज्य सरकारला दिली जाईल, असेही जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.

आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला अस वाटतं मी मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढं जात नाही. मराठा समाजानंसुद्धा मी जे सांगतोय की कोणीही आत्महत्या करू नका. मराठा आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये, ही तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे. सरकारनेही गांभीर्याने घ्यावे, लोकांचे लेकरं मरत असताना मजा बघू नका. हे आंदोलन गांभीर्यान घ्या तुम्हाला जड जाईल. पुन्हा एकदा राज्य सरकारला शेवटचं सांगतो मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्या. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विनंती की कोणीही आत्महत्या करू नका आणि कुणाला करू पण देवू नका. कुणीही उग्र आंदोलन करायचं नाही. शांततेत आंदोलन करा.

आज २८ ऑक्टोबर असून उद्या २९ पासून आपले जे साखळी उपोषणं सुरु आहेत त्याच ठिकाणी आमरण उपोषणं सुरु करा. ज्यांना शक्य आहे, वयोमर्यादा लक्षात घेवून आमरण उपोषण उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातले सुरु होणार आहे. प्रत्येकाने पाणी पिवून सुरु करायचं ठरलेलं आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांनी २९ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करावं. ठरल्याप्रमाण गावंच्या गावं एकजुटीनं एकत्र बसा.

आपल्या गावात किंवा आपल्या दारात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येवू द्यायचं नाही. आपणही मराठा समाजानं कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या दारात जायचं नाही. ठरल्याप्रमाणं आपलं दुसर्या टप्प्यातलं सरसकट आमरण उपोषण २९ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. गावच्या गावांनी यात सहभागी व्हावं कारण आपल्या लेकरां बाळांना आपल्याला आरक्षण मिळू द्यायचं आहे.

आज, २८ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळपर्यंत त्यांचं (राज्य सरकारचं) उत्तर आल्यानंतर २९ ऑक्टोंबरपासूनच्या दुसर्या टप्प्यातील आंदोलनाबाबत सांगणार आहोत. आमरण उपोषण दरम्यान कोणाच्या जीवितास काही झाल्यास त्याची सगळी जबाबदारी ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांची राहील.

तिसर्या टप्प्यातलं आंदोलन हे ३१ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. या तिसर्या टप्प्यातील आंदोलनासंदर्भातील माहिती मराठा समाज आणि राज्य सरकारला ३० ऑक्टोबर रोजी सांगितल्या जाईल. आता दुसर्या टप्प्यातल्या उपोषणाला आमरण उपोषण प्रत्येक गावांत सुरु होणार आहे. या उपोषणादरम्यान कोणाच्या जीविताला धोका झाल्यास पुन्हा सांगतो की त्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची राहील.

कारण यात खूप मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने समाजातील लोकं २९ ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार आहे. राज्यातलं हे पहिलं उपोषण असणार आहे की इतक्या मोठ्या संख्येने लोकं उपोषण करणार आहे. आपल्या न्याय हक्कासाठी मराठा समाजबांधव दुसर्या टप्प्यातील उपोषण करणार आहे. सर्वांनी शांततेच्या मार्गाने उपोषण करावं. आरक्षण मिळणार आहे त्याची काळजी करू नका फक्त कुणीही आत्महत्या करू नका, असे शांततेचे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा युवकांना केले.

Back to top button
error: Content is protected !!