छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

साजापूरमध्ये वीजचोरी करणाऱ्या 15 जणांवर गुन्हा दाखल ! लघुदाब वाहिनीवर आकडा तसेच मीटरमध्ये छेडछाड अंगलट !!

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील साजापूरमध्ये 99 हजार 812 रुपयांची वीजचोरी करणाऱ्या 15 जणांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या दौलताबाद शाखेचे सहायक अभियंता धनंजय बाणेदार, तंत्रज्ञ शेख इम्रान हे 1 जून तसेच 2 जुलै 2024 रोजी सकाळी साजापूर येथे गेले असता त्यांना काही नागरिक लघुदाब वाहिनीवर सर्व्हिस वायरच्या साह्याने आकडा टाकून तसेच मीटरमध्ये छेडछाड करून चोरून वीज वापरत असल्याचे आढळले.

छाया रमेश तोरणे, शबाना नसीब सय्यद, स्वाती नंदू बोर्डे, रुबिना शेख सद्दाम, सलमान शब्बीर कुरेशी, प्रधान संजय, बेबी अशोक झिने, हारुण मोहंमद शेख, विजय निवृत्ती डघले, संदीप मनोहर गाडेकर, निलेश नीना, प्रियांका सुरेश चौधरी, बाबुराव तातेराव खाडे, विजय पिराजी नेवल व चरणसिंग किसनसिंग परमार (सर्वजण रा. साजापूर) यांनी 99 हजार 812 रुपये किमतीची 8932 युनिट वीज चोरली.

महावितरणने या सर्वांना वीजचोरीची निर्धारित बिले दिली होती. मात्र ती भरण्यास आरोपींनी टाळाटाळ केली. सहायक अभियंता धनंजय बाणेदार यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button
error: Content is protected !!