महाराष्ट्र
Trending

मराठा आरक्षणावर गरळ ओकणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडली, तीन आंदोलक पोलिसांच्या ताब्यात !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – मराठा आरक्षणाच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. आज, २६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास ही गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने लाखोंचे मोर्चे काढणार्या मराठा समाजाची देशानेच नव्हे तर जगाने दखल घेतली. ५६ मोर्चेांदरम्यान कुठलीही हिंसा न करता मराठा समाजाने मोर्चाचा एक आदर्श जगासमोर घालून दिला. अशा या मराठा समाजाला वर्षानुवर्षे मागणी करूनही आरक्षण मिळात नसल्याने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत काल, २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

दरम्यान, आज, २६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आंदोलक देत होते आणि गाडी फोडत होते.

दरम्यान, गाड्यांची तोडफोड घडताच सदावर्ते यांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. फोडलेल्या गाड्या पोलिसाांनी भोईवाडा पोलिस स्टेशनला लावल्या आहेत. तेथे गाड्यांची पाहणी व चौकशीची प्रक्रिया पार पाडली जाईल.

Back to top button
error: Content is protected !!