छत्रपती संभाजीनगरसिल्लोड
Trending

अजिंठ्याजवळ घाटाच्यावर बाळापूरनजीक गाडी लुटण्याचा बनाव ! फर्दापूरजवळील मेवाती हॉटेलवर प्लॅन शिजला, १०० क्विंटल लसून परस्पर धुळ्याच्या मार्केटला विकला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- इंदोरच्या व्यापार्याचा माल समोरच्या व्यक्तीस न देता तो माल लुटल्याचा बनाव करून परस्पर धुळ्याच्या मार्केटमध्ये विकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.  फर्दापूरजवळील मेवाती हॉटेलवर प्लॅन शिजला त्यानंतर अजिंठ्याजवळ घाटाच्यावर बाळापूर गावाजवळ गाडी लुटण्याचा बनाव करण्यात आला आणि १०० क्विंटल लसून परस्पर धुळ्याच्या मार्केटला विकल्याने व्यापारीवर्गांत एकच खळबळ उडाली आहे.

सुरेद्र राजकुमार साधवाणी (वय 37 वर्षे व्यवसाय लसूण कांदा व्यापार, रा. प्रेमनगर, माणिकबाग रोड, इंदोर जि. इंदोर राज्य मध्यप्रदेश) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, इंदोर येथील देवी आहिल्याबाई मंडीमध्ये विश्वास ट्रेडर्स नावाने ते लसूण कांदा बटाटा याचा व्यापार करतात. माल मार्केटमध्ये आल्यावर तो खरेदी व विक्री ते करतात. तो माल ते ट्रान्सपोर्टने व्यापारी यास विक्री करतात.

दिनांक 23/08/20023 रोजी व्यापारी सुरेद्र राजकुमार साधवाणी यांनी खरेदी केलेला 100 क्विटंल लसूण भाग्यलक्ष्मी ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक अभिषेक चिचाणी (रा. हासलपुर ता.महू जि. इंदोर) यांना दिला. सदर माल त्यांनी त्यांच्याकडे येणारे ट्रान्सपोर्ट वरील इकोमेंट वाहन क्रमाक एमएच 18 बीजी 8465 या गाडीत इंदोर देवी आहिल्याबाई मंडीमधून भरून बिजापूर राज्य कर्नाटक येथील माकेर्ट यार्डमध्ये के. के. बागवान या व्यापा-याकडे विक्री करण्यासाठी रात्री अकरा वाजता पाठवला.

दिनांक 25/08/2023 रोजी सकाळी साडे पाच वाजता व्यापारी सुरेद्र राजकुमार साधवाणी यांना भाग्यलक्ष्मी ट्रांन्सपोर्ट मालक अभिषेक चिचाणी यांनी फोन करून कळविले की, आता मला आपण पाठविलेली लसूणची गाडी ही अजिंठा (ता. सिल्लोड) जवळ चोरी झाल्याचे वाहन क्रमाक एमएच 18 बीजी 8465 या वाहनाचे मालक गोलु अजित खान यांच्या वडीलानी फोन करून सांगितले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी कळविले.

ते पोलीस स्टेशन अजिंठा येथे तक्रार देण्यासाठी गेल्याचे कळवले. त्यामुळे मी व ट्रान्सपोर्ट मालक अभिषेक चिचांणी तसेच माझे मित्र अंकीत पटेल असे आम्ही तिघे सकाळी साडे नऊ वाजता पोलीस स्टेशन अजिंठा (ता. सिल्लोड) निघालो. चार वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन अजिंठा येथे आल्यावर गाडी चालक गोलु अजित खान (रा. खडकवाणी ता. कसरावत जि.खरगोन) यास गुन्हा दाखल केला का याबाबत विचारणा केली असता त्यांने सांगितले की, मी व जितेंद्र चिताराम गोलकर (रा. आबाडोचर जि. खरगोन) असे आम्ही दोघे माझी गाडी घेवून कर्नाटककडे जात असताना छत्रपती संभाजीनगर जळगांव रोडवर फर्दापूरजवळील मेवाती हॉटेलवर गाडी थांबविली.

तेथे सद्दाम व त्याचा भाऊ शाहरुख असे व्यक्ती आले आम्ही सर्वानी त्याठिकाणी गाड़ी कुठे लुटायची यांची प्लॉनिंग केली. घाटाच्यावर बाळापूर गांवाजवळ गाडी लुटण्याचा बनाव केला. व त्यानंतर सकाळी वडीलांना फोन करुन माहिती देण्याचे सांगितले नंतर आम्ही तो लसूण धुळे येथील मार्केट मध्ये विक्री करण्यासाठी सददाम, शाहरुख यांना पाठवले परंतु मी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो असता पोलीसांना आम्ही बनाव केल्याबाबतचा संशय आला असे व्यापारी सुरेद्र राजकुमार साधवाणी यांना गोलु अजिज खान याने सांगितले.

याप्रकरणी व्यापारी सुरेद्र राजकुमार साधवाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजिंठा पोलिस स्टेशनमध्ये चालक गोलु अजित खान (रा. खडकवाणी ता. कसरावत जि.खरगोन), जितेंद्र चिताराम गोलकर (रा. आबाडोचर जि. खरगोन), सददाम, शाहरुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!