महाराष्ट्र
Trending

ग्रामसेवकाने सात हजार रुपये व black dog दारूचे दोन खंबे लाच मागितली ! बदनापूर पंचायत समितीचा कारभार चव्हाट्यावर !!

संभाजीनगर लाईव्ह, १० – बदनापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकार्यांची निधीच्या परवानगी लेटरवर सही घेऊन देण्यासाठी एका ग्रामसेवकाने सात हजार व चक्क black dog दारूचे दोन खंबे अशी लाच मागितली. तसेच BDO मॅडमसाठी ४ हजार, विस्तार अधिकारी यांना १ ते २ हजार आणि क्लार्कसाठी ५०० रुपये द्यावे लागतात असे म्हणून एका महिला ग्रामसेवकाने तक्रारदार यांना लाचेस प्रोत्साहन दिले. याप्रकरणी बदनापूर तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

1. सिद्धार्थ रामकृष्ण घोडके, ग्रामसेवक, पंचायत समिती बदनापूर (वर्ग-3), 2. श्रीमती अंबुलगे, ग्रामसेवक उज्जैनपुरी, पंचायत समिती बदनापूर (वर्ग-3) अशी आरोपींची नावे आहेत.

मौजे मांजरगाव (ता. बदनापूर जि.जालना) येथे करण्यात आलेल्या भूमिगत नाली बांधकामाची M. B. व उर्वरीत 1,48,467 रुपयांचा निधी बांधकाम करणारे मजुरांना व बांधकाम साहित्य देणारे दुकानदार यांना अदा करण्याचे परवानगी लेटरवर गट विकास अधिकारी पंचायत समिती बदनापूर यांची सही घेवून देण्यासाठी यातील आरोपी सिद्धार्थ घोडके यांनी दिनांक 20/06/2023 रोजी तक्रारदार यांना पंचासमक्ष 7000 रूपयांची लाचेची मागणी केली.

सदर लाच घेण्यासाठी यातील ग्रामसेवक श्रीमती अंबुलगे यांनी एका लाखाचे बिलासाठी BDO मॅडम यांना 4,000 रूपये आणि विस्तार अधिकारी यांना 1 ते 2 हजार रूपये द्यावे लागतात, तसेच क्लार्क यांना सुद्धा वेगळे 500 रूपये द्यावे लागतात असे म्हणून तक्रारदार यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. सदर गुन्ह्यात आलोसे सिध्दार्थ घोडके व श्रीमती अंबुलगे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलिस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी व तपास अधिकारी – किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि.जालना, पोलीस अंमलदार – शिवाजी जमधडे, गजानन घायवट, कृष्णा देठे, गणेश बुजाडे ला.प्र.वि. जालना यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!