छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती राजर्षी शाहू अर्बन बॅंकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता परस्पर विकली ! कर्जदार व तत्कालीन सह. दुय्यम निबंधकावर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – छत्रपती राजर्षी शाहू अर्बन बॅंकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता परस्पर विकल्याप्रकरणी कर्जदार व तत्कालीन सह. दुय्यम निबंधकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील शाखेत हा प्रकार समोर आला आहे. यामुळे बॅंकेच्या व्यवस्थापकाने तातडीने पोलिसांत धाव घेवून घडलेली हकीकत कथन केली.

छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को. ऑप बँक लि. बीड या बॅंकेची छत्रपती संभाजीनगरमधील शाखा नाईक कॉलेज जालना रोड परिसरात आहे. 04/04/2019 ते 26/06/2023 दरम्यान हा प्रकार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

1)कर्जदार-विनोद मधुकर बोंबले (वय 41वर्षे, रा.प्लॉट नं54 न्यू SBH कॉलनी ज्योतीनगर, शहानुरवाडी, छत्रपती संभाजीनगर 2) सतिश मुलचंद व्यास (वय 62 वर्षे, रा. प्लॉट नं. 57 न्यू SBH कॉलनी, ज्योतीनगर, शहानुरवाडी छत्रपती संभाजीनगर 3) तत्कालीन सह. दुय्यम निबंधक क्रं. ३, छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को. ऑप बँक लि. बीड या बँकेचे छत्रपती संभाजीनगर शाखा व्यवस्थापक बिभीषण अर्जुनराव पवार यांनी दिलेल्या फिर्दीत नमूद केले आहे की, छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को. ऑप बँकेकडून आरोपी क्रं 1 विनोद मधुकर बोंबले यांनी बांधकाम व व्यवसायकरीता मालमत्ता प्लॉट नं 54 न्यू SBH कॉलनी ज्योतीनगर शहानुरवाडी छत्रपती संभाजीनगर ही बँकेकडे तारण ठेवून कर्ज घेतले.

कर्ज घेतलेले असताना कर्जाची पूर्णपणे परतफेड न करता बँकेस कोणतीही माहिती न देता आरोपी क्रं 2 सतिश मुलचंद व्यास  व 3 तत्कालीन सह. दुय्यम निबंधक यांच्याशी संगणमत करून बँकेचे बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार करून तारण असलेली मालमत्ता नोंदणी कृत विक्रीखत करून देवून परस्पर तारण असलेली मालमत्ता विक्री करून बँकेची विश्वासघात करून फसवणुक केली. सदरची फिर्याद मा.7 वे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी औरंगाबाद यांचे कलम 156 (3) CrPC अन्वये प्राप्त आदेशाने दाखल

याप्रकरणी शाखा व्यवस्थापक बिभीषण अर्जुनराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1)कर्जदार-विनोद मधुकर बोंबले (वय 41वर्षे, रा.प्लॉट नं54 न्यू SBH कॉलनी ज्योतीनगर, शहानुरवाडी, छत्रपती संभाजीनगर 2) सतिश मुलचंद व्यास (वय 62 वर्षे, रा. प्लॉट नं. 57 न्यू SBH कॉलनी, ज्योतीनगर, शहानुरवाडी छत्रपती संभाजीनगर 3) तत्कालीन सह. दुय्यम निबंधक क्रं. ३, छत्रपती संभाजीनगर यांच्यावर सिडको पोलिस स्टेशनमध्ये कलम 420,406, 415,423, 468,471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि शिंदे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!