महाराष्ट्र
Trending

भोकरदनच्या भारत फायनान्स शाखेचा कॅशियर ११ लाख घेऊन पळाला ! महिला बचतगटाची रक्कम बॅंकेत जमा करण्यासाठी गेला अन् परतलाच नाही !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – भोकरदनच्या भारत फायनान्स शाखेचा कॅशियर ११ लाख घेऊन पळाला. महिला बचतगटाची रक्कम बॅंकेत जमा करण्यासाठी गेला अन् परतलाच नाही. शाखा व्यवस्थापकाने अनेक फोन केले मात्र, त्याने फोन उचललाच नाही. यामुळे जालना जिल्ह्यातील भोकरदन भारत फायनान्स शाखेच्या व्यवस्थापकाने पोलिस ठाणे गाठून हकिकत सांगितली.

सुधाकर यादव अपुलवार (रा. बितमाळ ता. उमरी, जि नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. कृष्णा वसंत जाधव (वय 30 वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी, ब्रांच मॅनेजर, भारत फायनायन्स,  रा. लक्ष्मीनगर भोकरदन, ता. भोकरदन, जि. जालना) यांनी या प्रकरणी पोलिसांना प्राथमिक माहिती दिली. कृष्णा वसंत जाधव हे भोकरदन येथील भारत फायनायन्समध्ये ब्रांच मँनेजर या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या सोबत सुधाकर यादव अपुलवार हा कॅशीयर म्हणून काम करतो. अन्य सहकारीही या शाखेत काम करतात.

शाखा व्यवस्थाप कृष्णा जाधव यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दिनांक 17/5/2023 रोजी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे ते त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी भारत फायनान्स भोकरदन येथे आले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास शाखेतील अन्य सहकारी हे वेगवेगळ्या खेडेगावाला बचतगटाचे हाप्ते वसुल करण्यासाठी निघून गेले होते. भोकरदनच्या भारत फायनायन्सकडे दररोज महिला बचतगटाचे पैसे जमा होतात. दि 17/05/2023 रोजी भारत फायनायन्समध्ये काही ठेव व वाटप करण्याची रक्कम जमा होती.

सकाळी जाताना शाखा व्यवस्थाप कृष्णा जाधव यांनी सोबत काम करणारा सुधाकर यादव अपुलवार (रा. बितमाळ ता. उमरी, जि नांदेड) यांना सांगितले होते की ही बचत गटाची जमा असलेली रक्कम तू बँकेत जावून जमा करून ये. बचत ठेवीचे पैसे जमा करणेसाठी नेहमी सुधाकर बँकेत जात असे. त्यामुळे शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी जमा असालेले 11,51,560/- रुपये सुधाकरकडे दिले व लोनसाठी कोणी सभासद आल्यास त्यांना कर्जाचे वाटप करा व शिल्लक पैसे बँकेत जामा करा, असे सुधाकर यांना सांगून शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव हे वसुलीसाठी वालसावंगी येथे निघून गेले.

दुपारी 02.30 वाजेच्या सुमारास शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी सुधाकरला फोन करुन विचारले की तू बँकेत जावून पैसे जमा केले का ? तेव्हा सुधाकरने सांगितले की, सद्या मी बँकेतच असून अर्धा तासात पैसे जमा होवून जाईल. नंतर पुन्हा शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी सुधाकरला पाच दहा मिनीटांनी फोन लावला तेव्हा त्याने फोन उचलला नाही. वारंवार फोन केले परंतु त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव हे सायंकाळी सात वाजता ऑफिसला पोहोचले तेव्हा ऑफिसला लॉक लावलेले दिसले.

नंतर ऑफिस उघडून पाहीले व कागदपत्रे तपासली आसता दि- 17/05/2023 रोजी कोणत्याही सभासदाला कर्जाचे वाटप करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पुन्हा सुधाकरला फोन केला परंतु त्याने फोन उचलला नाही. म्हणून संशय आल्याने शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी ऑफिसमध्ये सर्व ठिकाणी पाहणी केली परंतु पैसे दिसून आले नाही. त्यामुळे शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी ही माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिली. त्यांनी सुध्दा ऑफिसमध्ये येवून पाहणी केली. त्यानंतरही सुधाकरला फोन केला परंतु त्याने फोन उचलला नाही.

त्यामुळे शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी भोकरदन पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून कॅशियर सुधाकर यादव अपुलवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भारत फायनान्सचे 11.51.560/- रुपये त्याने अपहार करून पलायन केल्याचा सुधाकरवर आरोप आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!