छत्रपती संभाजीनगर
Trending

हर्सूलमध्ये दुचाकीस्वारास ट्रकने चिरडले, वैजापूरच्या दुचाकीस्वाराच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले ! पैठणच्या ट्रक चालकासह दोघांवर गुन्हा दाखल !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – नेहमीप्रमाणे कंपनीत ड्युटीवर जात असताना दुचाकीस्वारास ट्रकने पाठीमागून भरधाव धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्यानंतर ट्रकचे चाक दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पिसादेवी ते हर्सूल रोडवर घडली. प्रदीप परसराम माळे (वय 30 वर्षे रा. मालेगाव, पोस्ट लामनगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु.रो. हर्सूल, होनाजीनगर जटवाडा रोड छत्रपती संभाजीनगर) असे अपघातातील मृताचे नाव आहे.

याप्रकरणी मृताच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, प्रदीप परसराम माळे हे मेनसारा टेक्नॉलॉजी कपंनी शेंद्रा एम.आय.डी.सी येथे काम करतात. दि 22/11/2023 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास प्रदीप माळे हे मोटार सायकल (क्र. MH 20 FZ 8230) बजाज कंपनीची पल्सर गाडीवर कपंनीत ड्युटीवर जात होते.

12.00 वाजेच्या सुमारास हर्सूल गावाकडून पिसादेवी रोडने कंपनीत जात असतांना ट्रक (क्र. MH 16 AE 7727) या वाहनाचे चालक ।) नितिन सुखदेव डोळस वय 32 वर्षे व्यवसाय ट्रक चालक रा. पैठण नाराळ ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर व सोबत 2) रवी लहु चव्हाण वय 23 वर्षे व्यवसाय- मजुरी यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक भरधाव चालवून प्रदीप माळे यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघातात प्रदीप माळे हे रोडवर पडले व त्यांच्या अंगावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने ते गंभीर जखमी होवून बेशुद्ध झाले. सदर अपघातानंतर प्रदीप माळे यांना उपचारकामी घाटी दवाखाना अपघात विभागात दाखल केले. डॉक्टरांनी प्रदिप माळे यांना 14.20 वाजता मृत घोषित केले.

याप्रकरणी मृत प्रदीप परसराम माळे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक ।) नितिन सुखदेव डोळस वय 32 वर्षे व्यवसाय ट्रक चालक रा. पैठण नाराळ ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर व सोबत 2) रवी लहु चव्हाण वय 23 वर्षे व्यवसाय- मजुरी यांच्यावर हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!