नशेच्या गोळ्यांची (बटन) विक्री करणारे दोघे जेरबंद ! जटवाडा रोडने शहरात प्रवेश करताच गुन्हे शाखेने पकडले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – नशेच्या गोळयांची (बटन) विक्री करणारे दोघे गुन्हे शाखेने जेरबंद केले. 1) आशिष राधाकिसन जाधव, वय 23 वर्षे, धंदा- मिस्त्रीकाम, रा. ताराबाई बिल्डींगजवळ, जटवाडा रोड, अंबरहील, छत्रपती संभाजीनगर 2) दीपक चंद्रभान दणके, वय 25 वर्षे, धंदा- बिगारी काम, रा. राजानगर, राजर्षी शाहू शाळेजवळ, अंबरहिल, छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत.
दिनांक. 20/09/2023 रोजी एन.डी.पी.एस पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दोन जण ग्रे कलरची होन्डा शाईन मो. सा. क्रं. MH 20 GH 5918 ने गुंगीकारक व नशेसाठी गैरवापर होवू शकणा-या गोळ्या विनापरवाना विक्री करीता 23:00 ते 23:30 वाजेच्या सुमारास अंबरहिल कडून जटवाडा रोडने शहरात येणार आहेत.
त्यावरून एन.डी.पी.एस. पथकाने सदर ठिकाणी पंच व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग, छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी यांचेसह सापळा रचला. दोघांना पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून नशेच्या गोळया व इतर असा एकूण 1,09,079/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नशेच्या गोळ्या बाळगून त्याची बेकायदेशीर रित्या विक्री करणारे आरोपी 1) आशिष राधाकिसन जाधव, वय 23 वर्षे, धंदा- मिस्त्रीकाम, रा. ताराबाई बिल्डींगजवळ, जटवाडा रोड, अंबरहील, छत्रपती संभाजीनगर 2) दीपक चंद्रभान दणके, वय 25 वर्षे, धंदा- बिगारी काम, रा. राजानगर, राजर्षी शाहू शाळेजवळ, अंबरहिल, छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेतले.
त्यांच्या विरुध्द पोलीस ठाणे हर्सूल येथे कलम 328, 276 भा.द.वि. सह गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS Act) अधिनियम 1985 कलम 8 (c), 22 (a), 29 सह सह कलम 18 (क), 27 (b) (ii) औषधी व सौंदर्य प्रसाधने अधि 1940 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखा श्री.संदीप गुरमे, यांचे मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक, सुधीर वाघ, जितेंद्र ठाकुर, प्रकाश डोंगरे, मंगेश हरणे, धर्मराज गायकवाड, अजय दहीवाल, दत्ता दुभळकर, गिता ढाकणे, नेमणुक NDPS पथक, गुन्हेशाखा, छत्रपती संभाजीनगर यांनी केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe