देश\विदेश
Trending

रेल्वेच्या तिहेरी भीषण अपघातात २८० जण ठार, ९०० जखमी ! मालगाडी आणि एक्सप्रेसच्या दुर्घटनेने ओडिशा हादरले !!

बालोसोर, ओडिशा, दि. ३ – ओडिशा राज्यातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. मालगाडीच्या धडकेने कोरोमंडल एक्सप्रेसच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्या. शुक्रवारी संध्याकाळी बालासोर जिल्ह्यातील बहनगा स्टेशनपासून दोन किमी अंतरावर असलेल्या पानपानाजवळ हा अपघात झाला. ओडिशामध्ये तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात 280 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ९०० जण जखमी झाले.

कोरोमंडल एक्सप्रेसचे चार डबे शुक्रवारी संध्याकाळी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात रुळावरून घसरले. त्यानंतर ते दुसऱ्या मार्गावर येणाऱ्या मालगाडीला धडकले. या अपघातात आतापर्यंत २८० प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलकडे जात असताना बहंगा बाजार स्थानकावर सायंकाळी ७.२० वाजता हा अपघात झाला.

शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस बालासोरजवळ सायंकाळी ७ वाजता रुळावरून घसरली. रेल्वेचे डबे समांतर रुळावर घसरले. काही वेळाने यशवंतपूरहून हावडाकडे जाणारी दुसरी गाडी त्या डब्यांना धडकली. त्यामुळे त्यातील ३-४ डबे रुळावरून घसरले. या अपघातानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्र्यांशी तातडीने चर्चा केली.  शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.

आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जखमींची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले

बालासोर येथे झालेल्या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः अपघातस्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव हे दोन केंद्रीय मंत्रीही होते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हेही शनिवारी सकाळी अपघातस्थळी पोहोचले. रेल्वे, एनडीआरएफ, एसडीआरएफची टीम बचाव कार्यात गुंतलेली आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेसची बंगळुरू-हावडा एक्स्प्रेसला टक्कर झाली. तत्पूर्वी, कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली, त्यामुळे बेंगळुरू हावडा एक्स्प्रेसची टक्कर झाली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे 12 डबे रुळावरून घसरले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!